रोहा

   रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे बालदिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे  नवजात बालकांचे डासांपासून रक्षण होण्यासाठी दहा नेट देण्यात आल्या.रोहे शहर व परीसरात सध्या डासांचा प्रादुर्भाव असुन डेंग्यू , मलेरिया सारखे आजार बळावत आहेत , नवजात बालकांचे या आजारांपासुन संरक्षण व्हावे या साठी चांगल्या प्रतिच्या दहा नेट बालदिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे देण्यात आल्या.

   क्लबचे प्रेसिडेंट इलेक्ट महेंद्र  दिवेकर यांच्या आर्थिक योगदानातुन व क्लब डायरेक्टर प्रदीप मेहेता यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या या उपक्रमासाठी क्लब प्रेसिडेंट गणेश सरदार , सेक्रेटरी निखिल दाते , ट्रेझरर मनोज बोराणा , प्रेसिडेंट इलेक्ट डॉ .कैलाश जैन , क्लब डायरेक्टर राकेश कागडा , दिपक सिंग , रूपेश पाटील , सुचित पाटील , डॉ .प्रथमेश बुधे आदी रोटरी सदस्य उपस्थित होते.रोहा उपजिल्हा रुग्णालयायाच्या वैद्यकीय आधिक्षक डॉ .अंकीता मते यांनी रुग्णालयाच्या वतीने रोटरी क्लब रोहा सेंट्रल चे आभार व्यक्त केले .

अवश्य वाचा