सुधागड-पालीदि.१४ नोव्हेंबर २०१९

   चांगले, पोषक व स्वच्छ अन्नपदार्थ मनुष्याच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. तर चांगल्या व स्वच्छ अन्नपदार्थावर देखरेख किंवा तपासणी अन्न औषध प्रशासन विभागाकडून केले जाते. अन्न औषध प्रशासनकडून तालुक्यातील  सर्व खाद्यविक्रेत्यांची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.सुधागड तालुक्यातील  हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते, दुकानातील खाद्यपदार्थांची तपासणी करून ते पदार्थ खाण्यासाठी योग्य आहेत का? आणि ते बनवताना नागरिकांच्या आरोग्याला फायदेशीर ठरतील का? त्यावर तपासणी वेळोवेळी केली गेली पाहिजे , अशी सामान्य नागरिकांची मागणी करत आहेत.पावसाळा संपले असुन थंडीचे दिवस सुरु झाले आहेत.त्यात  दिवस भर गर्मी तर रात्री थंडी या वातावरणामुळे आजार पणाला आमंत्रण अशा वातावरणात  आजार पसरायला सुरुवात होते.काही ठिकाणी तर  रस्त्यावर बसणारे फेरीवाले, खाद्यविक्रेते हे साफ व स्वच्छ पाण्याचा वापर न करत असल्यामुळे ते पदार्थ खाल्यानंतर अनेक लोकांना अजाराची लागण होते. याकारणामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते.

   रस्त्यावरील टपऱ्या, हातगाड्या, चायनीज, पाणीपुरी अनेक  आवडीने खातात परंतु पदार्थात खाद्यविक्रेते निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरतात जे खाल्ल्याने लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.अन्न औषध प्रशासनाने सर्व दुकानांची तपासणी करूनच  त्यांना परवाना देणे गरजेचे आहे. जेणेकरून परवाना दिल्या कारणामुळे दुकानांची, हातगाडी चालकांची नोंद मिळेल व त्यांची तपासणी करणे सोपे जाईल. अन्न हे आरोग्याला पोषक असले पाहिजे तर ते खाद्य पदार्थ बनावट शुद्ध साहित्याचा वापर होत आहे कि नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी कोणावर आहे? असा प्रश्न देखील सामान्य नागरिकांच्या मनात आहे. मध्यमवर्गीय नागरिक खिशाला परवडणाऱ्या हातगाड्यांवरील खातात आणि हातगाड्यासुद्धा अस्वच्छ ठिकाणी असतात जे सामान्य माणसाच्या शरीरास अत्यंत धोकादायक आहे.आशा खाद्यविक्रेत्यांवर कारवाई करणे गरजेचे असते.वैशिष्ट्य म्हणजे  आज पर्यंत सुधागड तालुक्यातील अन्न प्रशासनाकडून एका ही छोटा किंवा मोठ्या दुकानदारांवर कारवाई झाली नाही. ही सर्वात महत्वाची बाब  आहे. 

   या मागे  नेमके कारण काय? सर्व दुकानदार नियमांचे पालन करतात  किंवा अन्न प्रशासन त्यांच्या पर्यंत पोचत नाही. ही विचार करण्या सारखी गोष्ट आहे.या सर्व बाबींनमुळे आता सामान्य नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.