पाली/वाघोशी

   सुधागडात पाली ग्रामपंचायतीकडून स्वच्छता अभियान मोहिमेला महत्व देऊन पाली शहरात कचरा हटावची सुरूवात   गेल्या 8 ते 9 महिन्यापासून सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या मोहिमेला जनतेकडून उत्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. पाली ग्रामपंचायतीने शहरातील स्वच्छतेसाठी घंटागाडीची सोय केली आहे. पूर्वी पाली शहरातील कचरा कुंडयामध्ये कचरा पूर्ण भरून कचरा खाली रस्त्यावर पडलेला दिसायचा. जागो जागी रस्त्यावर कच-याचे ढीग पहायला मिळायचे. यामुळे पालीतील रहीवाशी यांच्या अरोग्यावर परिणाम होत असत.

   बिल्डिंगमध्ये राहणारे रहीवाशी तसेच भाजीवाले व इतर दुकानवाले यांचा कचरा नेहमी रस्त्यावर पडलेला दिसायचा. परंतू ही संपूर्ण परिस्थिती आज पाली ग्रामपंचायतीच्यावतीने बदलून टाकल्याचे आज दिसत आहे. हा कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने घंटागाडी आणि ट्रक्टर सोय करण्यात आली आहे. पाली शहरात ही कचरा गोळा करणारी घंटागाडी सर्वत्र फिरत असून गाडीबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने सफाई कामगार ही सज ठेवलेले आहेत. या घंटागाडीवर ग्रामंपचयातीकडून स्पीकर बसविण्यात आलेले आहेत. या स्पीकरव्दारे ‘‘गाडीवाला आया घरसे निकाल’’, ‘‘स्वच्छ भारत इरादा कर लिया हमने’’, ‘‘देशसे यह वादा कर दिया हमने’’ अशा प्रकारे स्पीकरवर गाणी लावून ही कचरा गाडी पालीतील गल्ली बोलातून फिरून कचरा गोळा करत आहे. या घंटागाडीचे गाणे ऐकायला आले की बिल्डिंगवाले, भाजीवाले, दुकानवाले, रहीवाशी आपला कचरा भरलले डबे, पिशव्या बाहेर काढून रस्त्यावर कचरा गाडी येताच त्यागाडीत कचरा टाकतात. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी रस्त्यावर पडलेला कचरा जमा करून नेहमीप्रमाणे गाडीत घेवून जाण्याचे काम नियमितपणे करीत असतात.

   त्यामुळे श्रीक्षेत्र बल्लाळेश्वराच्या पालीत कचरा हटाव या मोहिमेमुळे स्वच्छ व सुंदर पाली पहायला मिळते. घंटागाडीवर वाजविण्यात येणारे गाणे लहानासून मोठयापर्यंत फेमस झाले आहे. या गाण्यानुसार कचरा हटव ही जोरदार चालू आहे. ऐवढेच नाही तर या गाण्याचा सुर गब्यातूनही पाली शहरात ऐकायला मिळाला.

अवश्य वाचा