पाली/वाघोशी

   सुधागड तालुक्यात बहुतांश गर्भवती महिला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभापासून वंचित रहात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पात्र महिलांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावयाचे असते, विवाहितेच्या माहेरच्या आणि सासरच्या नावातील तफावत,आधार लीकं बॅंक खात्यात पैसे जमा होणे , जमा झालेल्या खात्याचा कुठलाही तपशील नसने , जन्माचा दाखला, नोदंणी क्रमांक अश्या अनेक बाबीची प्रमुख अडचन या  योजनेचा लाभ घेण्यासाठी होत आहे. तालुक्यातील मंगल दिपक कुभांर यांनी दिड वर्षापुर्वी या योजनेचा लाभ मिळावा म्हणुन अर्ज केला होता त्यांच्या खात्यात आरोग्य विभागा कडुन पैसे वर्ग झाल्याचे दाखवले जाते मात्र त्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसल्याचे कुभांर यांनी सांगीतले .

   तसेच आरोग्य विभागातुन कुठलाही तपशील मिळत नसल्याने अनेक लाभार्थी हे कार्यालयाच्या पाय-या झीजवुन वैतागले आहेत. सुधागड तालुक्यात प्रधामंत्री मातृवंदना योजने अंतर्गत 1 एप्रिल ते नोव्हेबंर शेवट पंर्यतं 197 महीलांची नोदं झाली असुन आत्तापर्यंत 144 महिलांना 5 हजार प्रमाणे 7लाख 20 हजार रुपयांचा लाभ मिळणार असुन 53 महिलांना लाभ मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरु असल्याचे आरोग्य विभागाने माहीती दिली आहे आहे.

   गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना सकस आहार घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी तसेच माता मृत्यू आणि बालमृत्यूच्या दरात घट व्हावी, यासाठी राज्य सरकारद्वारे प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येते. प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा मातांनाच या योजनेंतर्गत पाच हजार रुपये दिले जातात. लाभ द्यावयाच्या रकमेची तीन टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिला एक हजार रुपयांचा हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर दिला जातो. दुसरा दोन हजार रुपयांचा हप्ता किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यानंतर व गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो. तर प्रसुतीनंतर अपत्याची जन्म नोंदणी, बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटॅटिस बी यांसारख्या लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर तिसरा हप्ता लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो.  शासनाची हि अतीशय उपयुक्त योजना आहे मात्र ती राबवीण्यासाठी व लोकांना लाभ मीळवुन देण्याकरीता  आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे .

अवश्य वाचा