रोहा

   राज्यातील सत्ता संघर्षाची परिणीती राष्ट्रपती राजवटीत झाल्यामुळे जनतेचे विविध प्रश्न प्रलंबित राहणार आहेत.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, खड्डेमय रस्ते ,रखडलेल्या पाणी योजना यांची पूर्तता न झाल्यास नागरिकांना मोठ्या हालअपेष्टाना सामोरे जावे लागणार आहे.रोहा तालुक्यात चक्रीवादळ तसेच अतिवृष्टी यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यातील सर्व प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली असून खड्डेमय आणि धुळीने भरलेल्या रस्त्यांवरून वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

   या रस्त्यांवरून वारंवार कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे नागरिकांना श्वसनाचे तसेच मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.रखडलेल्या पाणी योजना वेळेत मार्गी लागणे गरजेचे आहे.याशिवाय लांबलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाला हमखास उत्पन्न देणारे वाल, चवळी,हरभरा, मूग या कडधान्यांचे तसेच कलिंगडासारखी नगदी पिके घेणे देखील अशक्य होणार आहे.याचा मोठा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत

अवश्य वाचा