पाली/बेणसे 

   रायगड जिल्ह्यांतील सुधागड तालुक्यातील अनुदानित अाश्रमशाळा चिवे येथील विद्यार्थी सर्वच खेळांत पारंगत अाहेत. कबड्डी खेळात तर अात्तापर्यंत अाश्रमशाळेतील विदयार्थ्यांनी राष्ट्रिय व राज्यस्तरावर मजल मारली आहे. याच कामगिरीची दखल घेत अाश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली अाहे. हे दोघेही डिसेंबर महिन्यात छत्तीसगड येथे होणार्या ६५ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत.या निवडीमुळे अनुदानित अाश्रमशाळा चिवे च्या शिरपेचात अाणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नुकतेच वाशीम येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत१४ वर्षे मुले कबड्डी स्पर्धेत चिवे अाश्रमशाळेतील खेळाडूंनी मुंबई विभागाचे नेतृत्व होते. या राज्य स्पर्धेत पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, मुंबई, लातूर अौरंगाबाद या विभागांचा सहभाग होता. मुंबई विभागाने पुणे विभागास पराभूत केले. हा रोमांचक सामना पाहतांना सर्व उपस्थितांनी मुंबई संघास प्रोत्साहन दिले. मात्र सेमी फायनलमध्ये लातूर संघासोबत निसटता पराभव झाला.

   या स्पर्धेत अष्टपैलू खेळ करत अनुदानित अाश्रमशाळा चिवे चे निलेश मोहन पारधी अाणि करण घुटे यांनी निवड सदस्यांवर प्रभाव पाडला. त्यामुळे निवड चाचणीमध्ये डावा कोपरा रक्षक म्हणून त्याची तर करण घुटे याची उजवा कोपरा रक्षक म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रिय स्पर्धेसाठी चिवे अाश्रमशाळेचे विद्यार्थी नेहमीच पात्र ठरत आले आहेत. यासर्व गोष्टीचे श्रेय मुलांची अथक मेहनत, योग्य प्रशिक्षण सराव, नियमित व्यायाम तर आहेच. याबरोबरच मुलांना सर्वतोपरी सहकार्य, मार्गदर्शन व प्रेरणा देणारे शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अाणि प्रशिक्षक संदेश नथूराम पिंगळे, व्यवस्थापक खोपडे अार. अार. अाणि समाधान परबळकर यांना जाते. या यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लिमये, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक जयवंत गुरव, तसेच वावळोली व पडसरे येथील अाश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतूक केले.

अवश्य वाचा