बोर्ली प़चतन

   ग्रामिण भागात आजसुध्दा स्रीयांच्या विविध आजारांबाबत मोकळेपणाने बोलले जात नाही त्यामुळे स्रीयांना मो ठया प्रमाणात आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.या गंभीर समस्येबाबत जनजागृती झाली पाहीजे या जाणिवेतुन गेली तिन वर्षे बोर्लीपंचतन येथे मोफत विविध आरोग्य शिबीराच्या माध्यमातुन लोकांची सेवा करण्याची धडपड करणारे श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावचे सुपुत्र डॉ. राजेश पाचारकर हे गेल्या जुन महीन्यापासुन बोर्ली पंचक्रोशीतील माध्यमिक शाळांमधे ईयत्ता आठवी पासुनच्या विद्यार्थिनिंना मासिक पाळीच्या समस्येबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन सॕनिटरी नॕपकिनचे वाटप करीत आहेत.आजपर्यत त्यांनी १५ शाळांना भेट देऊन सुमारे १५०० मुलिंना याबाबत मोकळेपणानं  मार्गदर्शन करुन त्यांच्यामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

   त्याच अनुषंगाने बुधवार दि.१३ नोव्हेंबर रोजी गोखले एज्युकेशन सोसायटी (नाशिक) यांच्या न्यु मॉडर्न स्कुल शिस्ते या शाळेमध्ये मासिक पाळी जागृती  संदर्भात शाळेतील विद्यार्थिनींजवळ मोकळेपणानं चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणुन त्यांना योग्य ती माहीती देण्यात आली व शाळेतील ४८ मुलींना सॕनेटरी नॕपकिनचे वाटप करण्यात आले.  यावेळी डॉ. पाचारकर यांच्य पत्नी सौ. आरती पाचारकर यांनीसुध्दा आपला सहभाग नोंदवुन मुलींना योग्य ती माहीती देण्यास मदत केली. यावेळी शाळेचे समन्वयक एन.एम. बापट सर, मुख्याध्यापक संतोष मुरकर, शिक्षक प्रतिनिधी डी.बी.वाणी, संस्थापक सदस्य श्री.इंद्रकांत हावरे, सर्व शिक्षक, महीला शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. डॉ.पाचारकर राबवीत असलेल्या या धाडसी उपक्रमामुळे मुलींमध्ये आपल्या आरोग्याबाबत जागृती निर्माण होण्यास मदत होत आहे. व अशीच आरोग्याबाबात जनजागृतीची कार्ये आपल्या हातुन घडत राहो अशा शुभेच्छा त्यांना शाळेच्या वतीने देउन त्यांचे मनापासुन आभार व्यक्त करण्यात आले.

अवश्य वाचा