अलिबाग

   अलिबाग तालुक्यातील गरुडपाडा येथील ग्रामपंचायत कावीरचे उपसरपंच प्रवीण भास्कर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळ गरुडपाडा यांच्यावतीने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी कबड्डीचे मर्यादित व आमंत्रित भव्य सामने आयोजित करण्यात आले आहेत.कावीर येथे प्रवीण कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन दुुपारी २-३० वाजता विधान परिषद सदस्य आ. जयंत पाटील यांच्या या हस्ते करण्यात येणार आहे.

   याप्रसंगी माजी आ. पंडित पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, कावीरचे सरपंच राजेंद्र म्हात्रे, तंटामुक्ती अध्यक्ष अजित पाटील, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, वाहतूक सुरक्षा दल व सागरी संरक्षण मुंबई व कोकण विभागाचे कायदेशीर सल्लागार ॲड. के.डी. पाटील आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

अवश्य वाचा