वावोशी

   आमचा गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत पंचायत समिती खालापूर यांच्या विद्यमाने शिरवली ग्रामपंचायत कार्यालय येथे खरीवली गणस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून पंचायत समितीचे श्री. म्हसकर साहेब हे उपस्थित होते.आमचा गाव आमचा विकास हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असल्याने या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीचे सन २०२०-२१ ते २०२४-२५ असे पंचवार्षिक विकास आराखडा व सन २०२०-२१ चा वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात येणार असून यासाठी गावातील शेतकरी, अनुसूचित जाती-जमाती, महिला, युवक-युवती, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी , ग्रामस्थ, स्वयंसेवक आदी घटकांशी विचार विनिमय केला जाणार आहे.

   त्यातून गावांच्या गरजांची निश्चिती व अपेक्षित उत्पन्न यांचा अंदाज घेऊन प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. म्हणून हे सर्वसमावेशक आराखडे कशा स्वरूपाचे आसायला पाहिजेत याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन खालापूर पंचायत समितीकडून या कार्यशाळेत देण्यात आले. यावेळी खरीवली गणातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, पोलिस पाटील, प्राथमिक शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गट अध्यक्षा, वनपाल, स्वयंसेवक आणि सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.