कोलाड

   लायन्स क्लब पुणे सहकारनगर व लायन्स क्लब पुणे नवचैतन्य आणि जनसमर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जनसमर्थ संस्थेच्या गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल जेजुरी येथे सप्तर्षी आधुनिक अवकाश निरीक्षण केंद्राचा शुभारंभ,खगोल शास्त्रज्ञ डॉ विशाल कुंभारे व फर्ग्युसन महाविद्यालयाचे सेवा निवृत्त प्राचार्य डॉ व्ही के वाघ यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न करण्यात आले,खगोलशास्त्रज्ञ डॉ. विशाल कुंभारे यांच्या मिशन ऐस्ट्रॉनोमी,इंडिया अंतर्गत भारतातील पहिल्या शालेय स्तरावरील "सप्तर्षी" आधुनिक अवकाश निरीक्षण केंद्राचे "गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल, जेजुरी" (पुणे) येथे ११नोव्हेंबर २०१९ ला ११वाजून ११मिनिटांनी या आधुनिक अवकाश निरीक्षण प्रयोग शाळेचे उदघाटन झाले.प्रसंगी यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.व्ही. के. वाघ सर व लायन्स क्लब पुणे चे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे सर तसेच गुरुकुल स्कुल चे संस्थापक डॉ. प्रसाद खंडागळे सर,शाळेचे प्राचार्य झगडे सर डॉ एम एस पालक डॉ श्याम लोखंडे सह विविध क्षेत्रातील मान्यवर व शिक्षक वर्ग आदी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.सदर अवकाश निरीक्षण केंद्राला डॉ. कुंभारे यांच्यामुळे अमेरिकन असोसिएशन ऑफ व्हेरिएबल स्टार ओब्जर्व्हर्स (AAVSO),अमेरिका आणि ऍड्रेक्स अॅस्ट्रोनॉमीकल असोसिएशन, माल्लोरका, स्पेन या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थांची मान्यता मिळाली आहे.

   या अवकाश निरीक्षण केंद्रामध्ये टेलिस्कोप, बायनोक्यूलर, निरीक्षणासाठी लागणारे सर्व फिल्टर्स, माहिती पुस्तिका तसेच इ-लायब्ररी, निरीक्षणासाठी उपयुक्त असे माहितीपट व सॉफ्टवेअर्स अश्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांसाठी दिल्या आहेत.प्रसंगी कार्यक्रमामध्ये खगोलशास्त्रज्ञ डॉ. विशाल कुंभारे यांनी लिहिलेल्या ओळख खगोलशास्त्राची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले असून अवकाश निरीक्षण केंद्राच्या संपूर्ण रूमला ३D पेंटिंग केले आहे. त्यामध्ये सूर्यमाला, ताऱ्यांचा जीवनक्रम, आकाशगंगा, कृष्णविवर, अंतराळवीर, चंद्रावरती प्रथम पोहोचलेल्या अपोलो ११ चे मॉडेल, अवकाश वाहन, तसेच असंख्य ताऱ्यांचे ३D पेंटिंग केले आहे.
या अवकाश निरीक्षण केंद्रातून डॉ. विशाल कुंभारे सरांनी टेलिस्कोप व इतर साधने कशी वापरायची, त्यातून अवकाश निरीक्षण कसे केले जाते  अश्या सर्व मूलभूत गोष्टींचे संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही दिले.

   या सर्व सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अवकाश निरीक्षण व संशोधनाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल व विद्यार्थी या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन ग्रामीनातला ग्रामीण विद्यार्थी खगोल वैज्ञानिक बनेल असा विश्वास खगोलशास्त्रज्ञ डॉ. कुंभारे यांनी व्यक्त करत या अवकाश निरीक्षण केंद्राचा जवळपासचे विद्यार्थी, शाळा, महाविद्यालय तसेच इतर लोकांनाही त्याबद्दलचे ज्ञान प्राप्त होईल असे डॉ. कुंभारे यांनी सांगितले.यावेळी प्रमुख अतिथी फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.व्ही. के. वाघ सर व लायन्स क्लब पुणे चे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे तसेच गुरुकुल स्कुल चे संस्थापक डॉ. प्रसाद खंडागळे शाळेचे प्राचार्य  झगडे सर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.खगोलशास्त्रज्ञ डॉ. विशाल कुंभारे यांच्या मिशन ऐस्ट्रॉनोमी,इंडिया अंतर्गत भारतातील पहिल्या शालेय स्तरावरील "सप्तर्षी" आधुनिक अवकाश निरीक्षण केंद्राचे "गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल, जेजुरी" (पुणे) येथे शुभारंभ करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर दिसत आहेत,

अवश्य वाचा