नेरळ

   1951 मध्ये स्थापन झालेल्या विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील शैक्षणिक संकुलात नवीन इमारत उभारण्यात आली आहे.त्या इमारतीचे लोकार्पण रविवार 17 नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे.पदवी,पदवित्तर आणि कौशल्य विकास तसेच रोजगारश्रम उपक्रम राबविण्यासाठी नवीन वास्तू सज्ज होत आहे.दरम्यान,मुंबई विद्यपीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या हस्ते नवीन वास्तू चे लोकार्पण केले जाणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विद्या मंदिर मंडळ स्थापन झाले.1951 मध्ये या मंडळाकडून नेरळ येथे विद्या मंदिर आणि दादर मुंबई येथे दादर विद्या मंदिर अशा दोन माध्यमिक शाळा सुरू झाल्या.या संस्थेकडून 1993 मध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले तर 2008 मध्ये कला आणि वाणिज्य शाखेचे वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाले.साधारण 3500 विद्यार्थी विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत.जागेची कमतरता भासत असल्याने विद्या मंदिर मंडळाने भव्य इमारत उभी करण्याचा निर्णय 2017 मध्ये घेतला होता.त्यात 7 मजली इमारतीचे नियोजित बांधकाम केले जाणार असून त्यातील आठ कोटी रुपये खर्चाचे चार मजले सर्व सोयीसुविधा सह तयार झाले आहेत.

   मुंबई विद्यापीठाच्या निकष आणि नियमानुसार इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून 30 हजार चौरस फुटाचे बांधकाम करून 27 खोल्यांची निर्मिती करण्यात आली आहे.त्यात 18 वर्ग तसेच आधुनिक पध्दतीचे संगणक कक्ष,विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज वाचनालय, कार्यालये, शिक्षक-प्राध्यापक कक्ष,यांची सर्व सुविधा युक्त उभारणी करण्यात आली आहे.त्यावेळी सर्व मजल्यांवर स्वच्छता गृह, अग्नी शमन यंत्रणा आणि दोन उदवाहन यांची सुविधा असून कँटीन देखील त्या इमारतीमध्ये आहे.तर भविष्यात विद्या मंदिर मंडळ विधी महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून कला आणि वाणिज्य बरोबर विज्ञान शाखेच्या सर्व फैकल्टी सुरू केल्या जाणार आहेत.वाणिज्य शाखेत विमा आणि बँकिंग या नवीन शाखा देखील उघडल्या जाणार असून माहिती तंत्रज्ञान,नर्सिंग, फॅशन डिझायनिंग आणि रोजगार निर्मिती साठी कौशल्य विकास उपक्रम राबविले जाणार आहेत.

   त्यामुळे भविष्यात नेरळ येथील विद्या मंदिर मंडळाच्या शैक्षणिक संकुलात रोजगार मिळवून देणारे पदविका,पदवी आणि पदवित्तर शिक्षक घेण्याची संधी उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे.यापूर्वी 50 वर्ग खोल्यांची व्यवस्था असलेल्या नेरळ मधील शैक्षणिक संकुलाबरोबर नवीन इमारतीच्या माध्यमातून संस्थेकडून उच्च शिक्षणाची आणखी कवाडे उभारली जाणार आहेत.येत्या रविवारी मुंबई विद्यपीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांचे हस्ते या वास्तूचे लोकार्पण केले जाणार आहे.

अवश्य वाचा