कोलाड

   स्वा.सु.नि. गुरुवर्य अलिबागकर महाराज यांच्या कृपा छत्राखाली गुरुवर्य स्वा.सु.गोपाळबाबा वाजे यांच्या आशीर्वादाने रायगड भुषण ह.भ.प.ना.ता.दहींबेकर व रायगड भुषण ह.भ.प.ना. बा. महाबळे यांच्या संकल्पनाने आज कार्तिकी वद्य तृतीया शुक्रवार दि.१५/११/२०१९ पासुन सोमवार दि.२५/११/२०१९ पर्यंत संभे ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.

   या सोहळ्याचे पालखी पुजन खासदार सुनिल तटकरे व मा.आ.धैर्यशील पाटील,विनोदभाऊ पाशीलकर, सुरेश महाबळे,शिवराम महाबळे,संजय राजिवले, जनार्दन घायले,नंदकुमार मरवडे यांच्या सुभेहस्ते होणार आहे.यासाठी श्री.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सत्संग वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष ह.भ. प. तुकाराम बांदल, उपाध्यक्ष अनंत सानप,सेक्रेटरी पांडुरंग सानप,उपसेक्रेटरी गणेश नलावडे, खजिनदार जितेंद्र दहींबेकर,उप खजिनदार दत्ता तेलंगे व दिंडी सोहळा कार्यकारणी अध्यक्ष रमेश बर्डे, उपाध्यक्ष परशुराम कापसे, संदेश सानप,सेक्रेटरी गणेश दिघे, उप सेक्रेटरी गणेश कुर्ले,खजिनदार चेतन ओंबले, विलास दहींबेकर,सल्लागार विलास पवार सर्व पदाधिकारी, सदस्य मेहनत घेत आहेत.चला आळंदीला जावू।ज्ञानेश्वर डोळा पाहू।।होतील संताचिया भेटी।सांगु सुखाचिया गोष्टी।।या नाम घोसात ही पायी दिंडी संभे, कोलाड,सुतारवाडी,निवे, जामगांव, घोटावडे, पुनावले मार्गी आळंदी येथे जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत