अखिल भारत जर्न्यालिस्ट फेडरेशनच्या तालुका उपाध्यक्ष पदी तालुक्यातील प्रमुख पत्रकारांमध्ये जे नाव उचारले जाते असे दैनिक पुढारी चे बोर्ली पंचतन प्रतिनिधी श्री. अभय पाटील यांची फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष यांनी प्रशस्तिपत्रक देऊन नियुक्ती केली यापूर्वी ही त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदचा वर्षाव होत असून त्यांच्या मित्र परिवार तसेच श्रीवर्धन व बोर्ली पंचतन मधील नागरिक त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देत आहेत अखिल भारत जर्न्यालिस्ट फेडरेशन ही संघटना पत्रकारांच्या शासकीय योजना व समस्यांसाठी तसेच न्याय,हक्क व संरक्षणासाठी देश पातळीवर पत्रकारांना संघटित करून एकत्रित करण्याचं काम करत आहे तरी या कार्यामध्ये आपल्या विभागातील सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे अशी  विनंती अभय पाटील केली,समाजकंटक का कडून दिवसेंदिवस वाढत चालले भ्याड हल्ले व हत्या थांबविणे हे आपल्यासाठी एक आव्हान असून ते आव्हान मोडून काढण्यासाठी व कायद्याची जरब बसण्यासाठी पत्रकारांना देश पातळीवर एकत्रित येणे काळाची गरज आहे.

   पत्रकार हा रोज घडणाऱ्या नवीन घटना घडामोडी सामान्य जनतेपर्यंत पोहचवणारा व्यक्ती असतो.ऊन पाऊस वारा वादळ पूर कश्याची ही तमा न बाळगता तो विविध क्षेत्रातील घटना तसेच नव नवीन माहिती प्रसार माध्यम च्या साहाय्याने लोकांना पोचवत असतो. रायफल प्रमाणे हातात लेखणी पकडून निधड्या छातीने समाज सेवा करणारा पत्रकार स्वतःचे संरक्षण करण्याचे विसरून जातो आणि त्याचा नाहक बळी जातो म्हणूनच राज्य,जिल्हा,तालुका व विभागातील दैनिक,साप्ताहिक,पाक्षिक ,न्यूज पोर्टल, यू ट्यूब चॅनलच्या श्रमिक तसेच मुक्त पत्रकारांनी *अखिल भारत जर्न्यालिस्ट फेडरेशन* मध्ये सहभाग घेऊन सहकार्य आवाहन करण्यात आले .देश, राज्य,जिल्हा,तालुका पातळी वर कार्यकरणीचा बैठका घेऊन संघटनेचे ध्येय,हेतू आणि उद्धिष्ट लवकरच स्पष्ट करण्यात येतील. संघटने मध्ये सहभागी होणाऱ्या पदाधिकारी व सभासदांना संघटनेचे ओळख पत्र आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येईल सभासद होण्याकरीता आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो व काम करत असलेल्या वृत्त पत्राचे ओळख पत्र पुढील वॉट्सअप क्रमांक वर पाठवावे 9421160366/7021756810 व संपर्क साधावा.

अवश्य वाचा