खांब-रोहे,दि.१४

   रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या ग्रा.पंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून ८ डिसें. रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याचे परिपत्रक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहिर केले आहे.येथील ग्रा.पंचायतीची थेट सरपंच पदाची निवडणूक मागील दोन वर्षापूर्वीच पार पडली.या निवडणूकीत थेट सरपंचपदासाठी निवडणूक लढवून विजय संपादन केलेल्या निकिता प्रमोद शिंदे या ओबीसी खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या होत्या.

   परंतू मुदत संपूनही आरक्षणासाठी लागणा-या कागदपत्रांची पूर्तता त्यांच्याकडून होऊ न शकल्याने अखेर त्यांचे सरपंचपद रद्द झाल्याने या पदासाठी ही पोट निवडणूक होत असून तशाप्रकारचे परिपत्रक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहिर केले आहे.त्या अनुषंगाने नामनिर्देशित पत्रे सादर सादर करावयाची मुदत दि.१६ नोव्हे.ते २१ नोव्हे.,नामनिर्देशित पत्राची छाननी दि. २२नोव्हे.,उमेद्वारी अर्ज मागे घेण्याची दि.२५ नोव्हें. तर प्रत्यक्ष मतदान रवि.दि.८ डिसें.रोजी तर मतमोजणी ९ डिसें.रोजी होणार असल्याचे परिपत्रकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अवश्य वाचा