माथेरानच्या खडकाळ भागात सुद्धा जागेची सुयोग्यपद्ध्तीने मशागत करून त्या ठिकाणी फळांची लागवडीसाठी उत्तम प्रकारे मेहनत घेतली जात आहे. आणि हा सुरू असलेला प्रयोग यशस्वी होण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट पूर्णतः कामे करताना दिसत आहेत.येथील हॉटेल हॉर्स लँड मध्ये बागेचे माळी काम पाहणारे गोविंद दाभाडे यांनी हॉर्सलँड हॉटेलच्या मोकळ्या जागेत अननस पिकविण्याचा प्रयोग यशस्वी केला असून एका रोपाला अननस आलेला आहे.

   तर केळी,पपई सुद्धा वाढ घेताना दिसतात. हॉटेल व्यवस्थापनाने आपल्या जागेतील एक गुंठ्यात ही लागवड केली असून उन्हाळ्यात सुध्दा विविध प्रकारची फळे तयार होत आहेत.माथेरान मध्ये मोठया प्रमाणावर माकडांची संख्या असल्याने इथे फळांची लागवड करणे खूपच त्रासदायक असते. त्यांच्या पासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी जाळी लावून या सर्व रोपांचे संगोपन केले जाते. प्रत्येक हॉटेल व्यावसायिकांनी अशाचप्रकारे मोकळ्या जागेत असे प्रयोग केले पाहिजेत.

अवश्य वाचा