अलिबाग

   आपली तक्रारही दाखल करून घेण्याच्या मागणीसाठी गेले पंधरा दिवस अलिबाग येथील पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करुनही पोलिस प्रशासन दखल घेत नसल्याने या साखळी उपोषणात बसलेले प्रशांत प्रभाकर केतकर यांनी सोमवारपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.आरोग्य विभाग देखील या उपोषणकर्त्यांकडे फिरकत नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.प्रशांत केतकर यांना 20 जुलै रोजी रात्री 9-00 च्या सुमारास त्यांना बाजारपेठेत चक्कर आल्याने समीर थळे आणि संतोष तांडेल यांनी त्यांना रिक्षातून श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. त्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आपले प्राण वाचले. परंतु तेथे झालेल्या वादामुळे सत्यवान थळे, संतोष तांडेल आणि देवेंद्र भुसाणे यांना त्रास सहन करावा लागला.

   त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र त्याविरोधात आपलीही तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार श्रीवर्धन पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे  ती तक्रार घ्यावी, या मागणीसाठी गेले 15 दिवस येथे साखळी उपोषण सुरू आहे. सत्यवान थळे यांना न्याय मिळावा म्हणून यापुढे आपण आमरण उपोषण करीत असल्याचे प्रशांत केतकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, आज दिलीप जोग, कोटीयन, अ‍ॅड अजय उपाध्ये, श्याम जोगळेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. व उपोषण मागे घेऊन कायदेशीर लढा देण्याचा सल्ला उपोषणकर्त्यांना दिला. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावण्याचा धोका असताना जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दखल घेतली जात नसल्याबद्दल दिलीप जोग यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.