अलिबाग

   राष्ट्रीय बालदिनाचे औचित्य साधून रायगड चाईल्डलाईन या संस्थेच्या वतीने 14 ते 21 नोव्हेंबर दरम्यन चाईल्डलाईनसे दोस्ती या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी मुलांचे अधिकार, अत्याचाराच्या विरोधात मुलांनी घ्यावयाची भुमिका, मुलांवरील अत्याचार प्रतिबंध करणार्‍या यंत्रणा, कायदे, धोरण व रचना यांची माहिती देणारे जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती रायगड चाईल्डलाईनचे संचालक अशोक जंगले यांनी दिली. या उपक्रमाची सुरुवात अलिबाग बसस्थानकावर 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सहयांची मोहिम तसेच पत्रक वाटप व मार्गदर्शन पोस्टर प्रदर्शनाने जिल्हाधिकारी डॉ विजय सुर्यवंशी व पोलिस अधिक्षक अनिल पारसकर, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे.

   15 नोव्हेंबर रोजी चोंढी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत व्हिडीओ, माहितीपट दाखवणे, 1098 ची माहिती देणे, पोस्को कायद्याची माहिती देणे, गुड टच, बॅड टचची माहिती देणे असा कार्यक्रम होईल. याला जिल्हा शिक्षण अधिकारी, मुख्याध्याप शिक्षक प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 16 नोव्हेंबर रोजी नागाव समुद्रकिनार्‍यावर, 17 रोजी कुरुळ, वावे, रेवदंडा, आक्षी दरम्यान, 18 नोव्हेंबर रोजी कर्जत रेल्वे स्थानक तसेच 21 नोव्हेंर रोजी खोपोली बाजारपेठ व खोपोली पोलिस ठाणे येथे 1098 ची माहिती देणे, मार्गदर्शन पोस्टर प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले आहे.

   19 नोव्हेंबर  रोजी पेण तालुक्यातील वरसई व वरवणे आश्रमशाळेत तसेच 20 नोव्हेंबर रोजी कर्नाळा चॅरिटेबर ट्रस्ट, माध्यमिक विद्यालय चावणे, आश्रमशाळा, यांच्यातर्फे चावणे, पनवेल, भालीवडी कर्जत येथे व्हिडीओ, माहितीपट दाखवणे, 1098 ची माहिती देणे, पोस्को कायद्याची माहिती देणे, गुड टच, बॅड टचची माहिती देणे असा कार्यक्रम होणार असून यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, महिला बालविकास अधिकारी, पेण तहसिलदार, कर्जत तहसिलदार, मुख्याध्यापक तसेच पनवेल व कर्जतचे आमदार, शिक्षण सभापती, दिशा केंद्राचे अध्यक्ष तसेच मुख्याध्यापक प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अवश्य वाचा