पनवेल :

   पनवेल शहरातील किंग्ज इलेकट्रोनिक्स या दुकानात 2 नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून महागडे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे आणि पथकाने अथक प्रयत्नानंतर आरोपीच्या मुसक्या आवळून 4 लाख 89 हजार 833 रुपये किमतीचे मोबाईल आणि 17 हजार 700 रुपये रोख रक्कम असा एकूण 5 लाख 7 हजार 533 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

   नवीमुबंई हद्दीतील घरफोडी करणा - या ४ नेपाळी आरोपीतांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली, याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शहरातील किंग्स इलेक्ट्रॉनिक्स येथे दिनांक ०२ / ११ / २०१९ रोजी रात्रौ २२ : ०० वा . ते दिनांक ०३ / ११ / २०१९ रोजी सकाळी १० : ०० वा . चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने दुकानाचे तळमजल्याचे लोखंडी शटरचे लॉक तोड्न दुकानातील एकुण २ , २८ , ९०० / - रूपये रोख रक्कम व ५ , ४८ , ९७३ / - रूपये किंमतीचे विवो , ओपो , आयफोन , सॅमसंग व टेक्नो कंपनीचे असे एकुण ३३ मोबाईल फोन असा एकुण ७ , ७७ , ८७३ / - रूपये किंमतीचा माल घरफोडी चोरी केल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे गु . रजि . नं । ४५४ / २०१९ भा . द . वि . क ४५४ , ४५७ , ३८० , ३४ प्रमाणे दिनांक ०३ / ११ / २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी यातील १ ) ४ , ८९ , ८३३ / - रूपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकुण २९ मोबाईल फोन २ ) १७ , ७०० / - रुपये रोख रक्कम असा एकूण ५ , ०७ , ५३३ / - एकुण रुपये किंमतीचा मुददेमाल गुन्हयाची उकल करण्यात आली. या गुन्ह्यांची पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंद होताच पोलीस उप आयुक्त अशोक दुधे , सहा. पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनप्रमाणे गुन्हेप्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ सदर गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवुन आधुनिक तंत्रज्ञानाचा कौश्यल्यपुर्ण वापर करुन ४८ तासांचे आत सदर घरफोडी चोरीमधील ०४ नेपाळी आरोपीतांना निष्पन्न केले . त्यांना कामोठे , नवीन पनवेल व ठाकुर्ली ( डोंबीवली ) परिसरातुन ताब्यात घेवुन सदर गुन्हयात अटक केली आहे . अटक आरोपीतांस न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक १६ / ११ / २०१९ पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.

   गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा कौश्यल्यपुर्ण वापर करुन अटक आरोपीताकडे कौशल्यपुर्ण तपास करुन सदर गुन्हयातील घरफोडी चोरी करून नेलेला एकुण ५ , ०७ , ५३३ / - रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला. सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक सनिल तारमळे , पोहवा विजय आयरे , बाबाजी थोरात , रविंद्र राऊत , पोना राजेश मोरे , अमरदिप वाघमारे , पोशि यादवराव घुले , सुनिल गर्दनमारे यांनी केली आहे. यावेळी महत्वाच्या वाणिज्य व इतर अस्थापना तसेच रहिवाशी सोसायटयांनी समोरील दोन्ही बाजुस रस्ता दिसेल अशा प्रकारे सी . सी . टिव्ही कॅमेरे बसवुन घ्यावेत . तसेच दुकानाच्या शटरसाठी सेंटर लॉकींग सिस्टीम बसवून घ्यावी आणि शहरातील घरफोडी सारखे गुन्हे कमी होण्यासाठी मदत करण्याचे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांनी केले आहे.

अवश्य वाचा