पनवेेल, दि.13

   पनवेल शहरातील किंग्स इलेक्ट्रॉनिक या नामांकित दुकानात करण्यात आलेल्या घरफोडी प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी जवळपास 5,07,533/- रु.किंमतीचा ऐवज हस्तगत केला असून याप्रकरणी 4 नेपाळ्यांना अटक करण्यात आली आहे.शहरातील किंग्स इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात घरफोडी करून नामांकित अशा कंपनीच्या मोबाईलची चोरी तसेच रोख रक्कम असा मिळून जवळपास 7,77,873/- रु.किंमतीचा माल चोरीस गेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

   याबाबत अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पो.हवा.विजय अहिरे, बाबाजी थोरात, रवींद्र राऊत, पो.ना.राजेश मोरे, अमरदिप वाघमारे, पो.शि.यादवराव घुले, सुनील गर्दनमारे आदींच्या पथकाने कसून व आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करून अवघ्या 48 तासात सदर घरफोडी चोरीमधील चार नेपाळी आरोपींना कामोठे, नवीन पनवेल व ठाकुर्ली (डोंबिवली परिसरातून) ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे. यांच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अनेक घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे.

अवश्य वाचा