पनवेल, दि.13 

    पनवेल जवळील तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या व्हीस्टा प्रोसेस्ड फूड्स या आंतरराष्ट्रीय कंपनीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयास 5 लाख रुपये किंमतीचे अँटी रेबीज व्हायल व शस्त्रक्रियांसाठी लागणारी अनेस्थेशीया औषधे आज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक येमपल्ले यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आली.

    यावेळी शिवसेनेचे स्थानिक नेते व व्हीस्टा प्रोसेस्ड फूड्स या आंतरराष्ट्रीय कंपनीचे व्यवस्थापकीय सल्लागार चंद्रशेखर सोमण, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भुपिंदर सिंग, वित्त प्रबंधक एस. राव, एच आर प्रमुख अनघा कदम, शिवसेनेचे महानगर संघटक अ‍ॅड प्रथमेश सोमण, शहरप्रमुख अच्युत मनोरे, शहर संघटक प्रवीण जाधव, उपशहर प्रमुख राहुल गोगटे, अनिल कुरघोडे, शाखाप्रमुख प्रसाद सोनवणे, चित्रपट सेनेचे मंदार काणे, युवासेना प्रभाग अधिकारी कौस्तुभ सोमण, रुग्णालयाचे इतर डॉक्टर्स व अधिकारी उपस्थित होते पनवेल येथे नुकतेच उपजिल्हा रुग्णालय सुरू झाले आहे. मुळातच उशिर झालेल्या या रुग्णालयाचे उदघाटन काहीशा घाई घाईतच उरकण्यात आले.म्हणूनच तेथील अजूनही काही प्रलंबित सुविधांच्या अभावाने रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकले नाही.

    याच  ग्रामीण रुग्णालयात अपींळ-ठरललळशी लसींचा तुटवडा आहे. मध्यंतरी पनवेल मध्ये एकाच वेळेस 25-30 जणांना कुत्रा चावल्याची घटना घडली तेव्हा या चे गांभीर्य आणखीनच अधोरेखित झाले. तसेच सदर रुग्णालयात 5 ऑपरेशन थिएटर आहेत. परंतु ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्या करिता अनेस्थेशीयाची औषधेही उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत ही बाब सदरचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला असे शिवसेनेचे स्थानिक नेते व व्हीस्टा प्रोसेस्ड फूड्स या आंतरराष्ट्रीय कंपनीचे व्यवस्थापकीय सल्लागार चंद्रशेखर सोमण यांना कळली असता त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली.

    व आपण काहीतरी व्यवस्था करू असे आश्‍वासन दिले. पनवेलचे वैद्यकियअधीक्षक नागनाथ येमपल्ले यांनी तसे मागणीचे पत्र ही दिले. सरकार दरबारी पाठपुरावा करण्यापेक्षा तातडीची सोया म्हणून सोमण स्वतः सल्लागार असलेल्या ’व्हीस्टा प्रोसेसड फूड्स’ या आंतराष्ट्रीय कंपनीच्या सीएसआर फंडातून आवश्यक तो पाठपुरावा करत मदत जमा करून रुपये 5 लाख किंमतीचे अँटी रेबीज व्हायल व शस्त्रक्रियांसाठी लागणारी अनेस्थेशीया औषधे उपजिल्हा रुग्णालयाला खरेदी करून दिली आहेत.उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक येमपल्ले यांना ही औषधे हस्तांतरित करण्यात आली. येमपल्ले यांनी यावेळी कंपनी प्रशासनाचे आभार मानले तर सोमण यांनी रुग्णालय उभे करण्यात फक्त योगदान न देता पुढे ते व्यवस्थित चालण्यासाठी ही आवश्यक सहकार्य करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत असे या वेळी सांगितले.

    या कामामुळे लगेचच शस्त्रक्रिया विभाग पूर्णतः सक्रिय होऊन हजारो गरीब रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे. कंपनीने या आधीही तळोजे पोलीस स्थानकातील टॉयलेट, तहसिल विभागाचे सर्कल ऑफिस, पटवर्धन रुग्णालयात आर ओ प्लांट, डायलिसिस च्या रुग्णांना आर्थिक सहाय्य असे अनेक उपक्रम सी.एस.आर फंडातून पूर्ण केले आहेत. या वेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भुपिंदर सिंग,  चंद्रशेखर सोमण, वित्त प्रबंधक एस. राव, एच आर प्रमुख अनघा कदम, शिवसेनेचे महानगर संघटक ऍड प्रथमेश सोमण, शहरप्रमुख अच्युत मनोरे, शहर संघटक प्रवीण जाधव, उपशहर प्रमुख राहुल गोगटे, अनिल कुरघोडे, शाखाप्रमुख प्रसाद सोनवणे, चित्रपट सेनेचे मंदार काणे, युवासेना प्रभाग अधिकारी कौस्तुभ सोमण, रुग्णालयाचे इतर डॉक्टर्स व अधिकारी उपस्थित होते.


अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.