पनवेल, दि.13 

   तळोजा एमआईडीसी येथे एका टँकरने वाहनाना धडक दिल्याने या अपघातात एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे आरोपी चालकावर तलोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टँकर क्र. एम एच 04 बीजी 4001 हा कलंबोली सर्कल येथून सीईटीपीकडून एमआयडीसी तलोजा येथे आला असता त्याने दुचाकीला धडक दिली.या धडकेत दुचाकी स्वार ज्ञानेश्‍वर पाटिल (29, सांगली) याचा जागीच मृत्यु झाला.

   त्यानंतर टँकरचालक थांबला नाही. टँकर चलकाने वाहन चालवत नेऊन पुढे चार चाकी 3 गाड्याना व 2 मोटर सायकल व एक सायकलला धडक दिली. यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून टँकरचालक बाबू वासनानी (नावड़े) याला पोलिसानी अटक केली आहे.

अवश्य वाचा