क्षमा सावंत, भारतीय वंशाच्या, सिटल सिटि काउन्सिल मेंबरच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात जगातली सर्वात मोठी कंपनी अँमेझॉन पुरस्कृत उमेदवार इगन अोरियाॅन उभे होते. क्षमा सावंत यांना पाडण्यासाठी अॅमेझाॅनसह अनेक भांडवलदारांनी, रिपब्लिकन नेत्यांनी इगन अोरीयाॅन यांना प्रचंड फंडींग उभे केले. सुमारे १.५ मिलियन् डाॅलर इतका पैसा निवडणुकीसाठी एकट्या अॅमेझाॅन कंपनीने विरोधकाला पुरवला.

    तरीही त्या कामगार चळवळीतील कामातून, वंशभेद चळवळीव्दारे त्यांनी केलेल्या आंदोलनातून त्या निवडून आल्या आहेत.क्षमा सावंत कोण आहेत?क्षमा सावंत यांचा जन्म पुण्यातला, शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले. साॅप्टवेअर इंजिनियर बरोबर त्यांचा विवाह झाल्यानंतर पतीबरोबर त्या अमेरिकेत शिफ्ट झाल्या. भारतीय समाजव्यवस्थेतील दारिद्रय आणि जातिव्यवस्था या समस्याविषयी त्या नेहमीच गंभीर राहिल्या आहेत. जेव्हा अमेरिकेतही वंशभेद, गरीबीसारखे प्रश्न दिसून आले तेव्हा त्यांनी आपले करियर मागे टाकून सोशॅलिस्ट अल्टरनेटिव्ह या डाव्या पक्षाच्या सदस्या बनल्या. त्यांनी कामगार चळवळीत काम करण्यास सुरुवात केली. सिटल शहरात कामगार चळवळीला त्यांनी आपल्या संघटन कौशल्याने प्रभावी बनवले. कामगार चळवळीचा सर्वात प्रमुख प्रश्न न्युनतम वेतनाचा तो त्यांनी लावून धरला.

    त्यामध्ये मोठ्या संघर्षानंतर त्या यशस्वी झाल्या. सिटल हे अमेरिकेतील पहिले शहर बनले ज्यामध्ये न्युनतम वेतन कायदा लागू झाला. १५ डाॅलर प्रतितास इतके न्युनतम वेतन कामगारांना अधिकृतपणे देणे कंपन्यांना बंधनकारक झाले.आत्ता अापल्याला समजून आले असेल; अॅमेझाॅन कंपनीचे मुख्यालय सिटल शहरामध्येच आहे आणि त्यांची कामगारसंख्याही तिथे मोठी आहे. त्यामूळे न्युनतम वेतनचा कायदा लागू करणाऱ्या क्षमा सावंत त्यांच्या विरोधकच ठरणार. त्यांच्या कामगाराच्या शोषणाला रोखणारया क्षमा सावंत त्यांच्या विरोधकच असणार. त्यामूळे अॅमेझाॅनचे त्यांच्या विरोधात फंडिंग उभे करण्याचे प्रमुख कारण – क्षमा सावंत यांनी आपल्या आंदोलनाने १५ डाॅलर प्रति तास न्यूनतम वेतनाचा कायदा सिटलच्या शहरात लागू केला हेच आहे.

अवश्य वाचा