पाताळगंगा : १३ नोव्हेंबर,

    साजगाव येथील जत्रेला ख-या अर्थाने प्रारंभ झाला असला तरी बैलबाजार या व्यवसायावर अवकळा निर्माण झाली आहे.पूर्वी मोठ्या प्रमाणात या जत्रेत बैलाचा मोठा बाजार भरला जात असे परंतू कोकणामध्ये औद्योगिकी करणामुळे शेती कमी झाली त्याच बरोबर शेतीचे विभाजन मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक  शेतकरी यांत्रिक पद्धतीने शेती करीत असल्याने शेतकरी गुरे सांभाळण्यास असक्षम होत आहे.तीस ते चालीस हजार रुपये जोडी ची किमत असल्यामुळे सर्वच शेतकरी यांची आर्थिक स्थिती उत्तम  नसल्यामुळे बैल घेण्यात शेतकरी पाठ फिरविली आहे.

    गुरांची वर्षभर जोपासना करावी लागत असून यामध्ये चा-यांचा तुटवढा या सर्व कारणावरून बैल जोडी पाळण्यास शेतकरी नाकारात्मक भूमिका बजावत आहे.शेतकरी गुरे पाळण करीत असत,त्या वेळी या साजगाव यात्रेस अनेक प्रकारची गुरे विकण्यास येत असे.कारण या वेळी शेतीची कामे पूर्ण झाली असायची आणि काहीना नवीन बैलजोडी हवी असायची परंतू तर कोणी आपल्या जवळील असलेली गुरे विकून पैसे मिळवीत असे तर कोणी आपल्या जवळील असलेली गुरांची देवाण -घेवाण करायची आणि ज्या शेक-याची गुरे सक्षम नसेल त्याला पैसे वरती देणे असेही होत असायचं.परंतू गुरे कमी झाली आणि या बैलांचा व्यापारही लोप पावण्याचा मार्गावर आहे.यामध्ये जास्तीत जास्त गुरे घाटमाध्यावरील  मोठ्या प्रमाणात गुरे विकण्यासाठी येत असतात.गुरांची संख्या कमी होत असल्याने त्यांच्या किमतीही गगनाला भिडत चालल्या आहेत.सामान्य शेतकरी याला हि गुरे घेणे मोठ्या जिगरीचे झाले आहे.

अवश्य वाचा