पाली/ वाघोशी

   सुधागड तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून तालुक्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधवाना आवहन करण्यात आले की, जास्तीत जास्त शेतक-यांनी आपल्या जवळच्या राष्ट्रीयकृत बॅंकेत तसेच महा ई सेवा केंद्र, आॅनलाईन पोर्टल च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाची शेतक-यासाठी असणारी फळपिक विमा योजना 2019 - 2020 लाभ घ्यावा.महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी वर्गासाठी अनेक विमा योजना, अनुदान योजना, पिककर्ज योजना अशा प्रकारच्या अनेक शेतक-यांना प्रोत्साहन व उत्पन्नवाढीसाठी योजना आखण्यात येतात. महाराष्ट्र शासनाने नव्यानेच फळपिक विमा योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांच्यासाठी सुरू केली आहे.भारत हा कृष्रिपधान देश आहे. भारत देशातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे. तसेच अनेक लोक शेतीशी निगडित व्यवसायही करतात.

   महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक योजना लागू करण्यात आली आहे. सन 2019- 2020 मध्ये अंबिया बहाराकरिता अधिसुचित फळपिकांना विमा योजना दि.31 आॅक्टोबर 2019 सुरू करण्यात आली आहे. कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीसाठी फळपिकांना अन्यय साधारण महत्व आहे. शेतक-यांनी फळपिकांची शेती केली तर त्यातून चांगले उत्पन्न मिळते. एखादयावेळी अवकाळी पाऊस, बदलते हवामान यांच्यामुळे फळपिकांचे उत्पन्नही कमी होते. तसेच प्रसंगी शेतक-यांना तोटाही सहन करावा लागतो. शेतक-यांनी या सगळया परिणामाचा विचार करून फळपिकांना हवामान, पाऊस, वादळ, गारपीट यांच्या धोक्यापासून विमा सरंक्षण दिल्यास शेतक-यांचे होणारे नुकसान टाळता येईल. तसेच त्याला होणारा आर्थिक तोटा भरून काढता येतो.महाराष्ट्र राज्यात फळपिक विमा योजना संत्रा, मोसंबी, काजू, डाळींब, आंबा, केळी व द्राक्ष (आंबिया बहार) या 7 पिकांसाठी 30 जिल्हयात महसूल मंडळ हा घटक धरून सन 2019 -20 मध्ये मंजूर करण्यात आली आहे.

   विमा संरक्षित रक्कम व शेतक-यांनी भरावयाच्या विमा हप्ता प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम विमा हप्ता म्हणून शेतक-यांना भरावी लागणार आहे. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतक-यांसाठी गारपीट या हवामान धोक्यासाठीचा सहभाग ऐच्छिक राहील व या करीता अतिरिक्त विमा हप्ता शेतक-यांना दयावा लागणार आहे. योजनेचे वेळापत्रक कर्जदार - बिगर कर्जदार शेतक-यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2019 विमा प्रस्ताव बॅंकाना सादर करावेत.

   ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्याकडून राबविण्यात येत आहे. शेतक-यांनी अधिक माहितीसाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टाॅक एक्सचेंज टाॅवर्स, 20 मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट मुंबई - 700023 फोन नंबर - 022 61710912 टोल फ्री नंबर - 18001116415  यांच्याशी संपर्क साधवा. 

अवश्य वाचा