कर्जत - दि.13

   हल्ली वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. कुटुंबातील माणसेच वाचन करीत नाहीत त्यामुळे मुलेही त्याकडे लक्ष देत नाहीत. खरे तर आपण वाचन करीत असलो तरी आपल्या मुलांमध्ये सुद्धा वाचनाची आवड निर्माण होईल. वाचनालय हे त्या शहराचा चेहरा असतो त्यावरून त्या शहराची किंवा गावाची संस्कृती समजते. मराठी भाषेतील शब्दांचे अर्थ विविध आहेत. ते गुगल सर्च करून कळणार नाहीत तर त्यासाठी शब्दकोश वापरले पाहिजेत.' असे मौलिक मार्गदर्शन प्रा. संध्या शहापुरे यांनी येथे केले.लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त पद्मा कुलकर्णी यांच्या तेजस्विनी व लहान मुलांकरिता प्रार्थना पुस्तिका तर मीना करमरकर यांच्या उर्मी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष दीपक बेहेरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

   याप्रसंगी शतकमहोत्सवी समिती अध्यक्षा डॉ. विजया पेठे, कार्याध्यक्ष पद्माकर गांगल, अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश वैद्य, श्रीराम पुरोहित, लेखिका पद्मा कुलकर्णी, मीना करमरकर, प्रकाशक अंशुल कुळकर्णी, आंनद दाते उपस्थित होते. लेखिका करमरकर, कुलकर्णी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.सूत्रसंचालन सुचिता जोगळेकर यांनी केले.विशेष म्हणजे जेष्ठ साहित्यिक वसंत जोशी यांच्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी राहुल वैद्य, दिलीप गडकरी, अनुुुपमा कुळकर्णी, विनायक बहुतुले, रामदास गायकवाड, सुभाषचंद्र नातू, योगिता साखरे,अनिल आंधळकर, वनिता गायकवाड, आदींसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा