बोर्ली

   श्रीवर्धन तालुक्यतील बोर्लीपंचतन हि महत्वाची व मोठी बाजारपेठ  आहे. परंतु सध्या या बाजारपेठेला वाहतुक कोंडीच्या समस्येने ग्रासले आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नेहमीच वर्दळ असते. कारण हा बाजारपेठेतील महत्वाचा चौक आहे. या चौकातुन होळीकडे जाणारा रस्ता हा खुपच महत्वाचा,  व वर्दळीचा रस्ता असून खूपच अरुंद आहे.या मार्गावरून प्राथमिक,माध्यमिक शाळा, कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र,बँक, औषध दुकाने व स्मशानभुमी याकडे जाण्याचा हा मुख्य मार्ग आहे. या चौकामधे छत्रपती शिवाजी महाजांचे स्मारक आहे. या स्मारकाच्या भोवतीसुध्दा अतीक्रमण झाले आहे ग्रामपंचायतीकडुन महाराजांच्या स्मारकाच्या स्वच्छतेबाबतसुध्दा दुर्लक्ष होत आहे.कोळी लोकांचे स्वतःचे सुसज्ज मच्छी मार्केट असतानासुध्दा मासळी विक्रेत्या मार्केटच्या बाहेर रहदारीला अडथळा करुन रस्त्यावर व्यवसाय करतात.

   त्यातच मालाचे येणारे टेंम्पो रस्ता अडवुन मालाची चढ उतार करतात आधीच अरुंद असलेला रस्ता त्यात हि समस्या नित्याचीच झाल्याने नागरीकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्राथमिक आरोग्य केंद्रामधे जाणा-या रुग्णांना व शाळेतील विद्यार्थ्यांना या समस्येचा रोजच त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे वाहतुक पोलीस व ग्रामपंचायत जाणुन बुजुन दुर्लक्ष करुत आहे का ? असा ही सवाल नागरिक करीत आहेत  बोर्लीपंचतनच्या सरपंच  ह्या या मार्गावरून त्यांचे कामा साठी जात असताना मच्छी विक्रेताना स्वतः सुचना करुन रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनासुध्दा सदर विक्रेते दाद देत नाहीत.

   त्यामुळे यावर ग्रामपंचायतीने कठोर उपाय योजना करुन वेळप्रसंगी कायदेशिर कारवाई करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या  स्मारकाजवळी मुख्य रहदारीच्या रस्यावरील  विक्रेत्यांनी केलेले आतिक्रमण यांच्या विळख्यातुन अतिक्रमणमुक्त करुन नागरीकांना वारंवार भेडसावणा-या या गंभीर समस्येवर कायमचा उपाय करावा अशी मागणी सर्व स्तरावरून नागरीकांकडुन  होत आहे  चौकटीतील बातमी याबाबत  भरड कोल कोळी समाजाचे  अध्यक्ष भास्कर चौलकर यांच्याकडे संपर्क केला असता यांच्याकडून सांगण्यात आले की आम्ही आमच्या महीलांना यापुढे रस्त्यावर न बसण्याबाबत योग्य त्या सुचना देऊ. यापुढे त्या आपला व्यसाय मच्छी मार्केटमधेच करतील*

अवश्य वाचा