महाड-दि.१३ नोव्हेंबर

   महाड शहरा पासुन एक किलो मिटर अंतरावर किल्ले रायगडाकडे जाणाNया मार्गावर मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमाराला झालेल्या कार अपघाता मध्ये महाड मधील व्यवसायीक जागीच ठार झाला तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले.भरवधाव वेगाने कार जात असताना चालकाचा कार वरील ताबा सुटल्यामुळे कार रस्त्या लगत असलेल्या खड्ड्यांमध्ये कोसळून अपघात घडला.अपघाताचे वृत्त समजताच नातेखिंड परिसरांतील ग्रामस्थांनी जखमींना मदत करुन त्वरीत त्यांना नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचारा करीता दाखल केले.महाड शहरांतील प्रसिध्द व्यावसायीक नितीन मणिलाल मेहता वय ५५,बांधमाक व्यावसायीक योगेश कळमकर आणि महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शैलेश सणस मंगळवारी रात्री किल्ले रायगडकडे जाणाNया मार्गा वरुन जात असताना त्याच्या कारला अपघात झाला.

   या अपघाता मध्ये नितिन मेहता यांचा जागीच मृत्यु झाला.योगेश कळमकर आणि शैलेश सणस यांना गंभीर दुखापत झाल्याने ज्यांना जवळच्या रानडे रुग्णालया मध्ये उपचारा करीता दाख्ल करण्यांत आले.कारला अपघात झाल्या नंतर कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या खोल खड्ड्या मध्ये कोसळली,खड्ड्या मध्ये पाणी साचल्याने कार मध्ये पाणी शिरले आणि कार मधुन प्रवास करीत असलेले नितिन मेहता यांचे निधन झाले.रात्रीच्या अंधारा मध्ये देखिल सभोवतालच्या नागरिकांनी मदत कार्याला सुरवात केली आणि जखमी झालेले कळमकर आणि सणस यांना त्वरीत कारच्या बाहेर काढण्यांत आले.

   मेहता यांना त्याच वेळी कार मधुन काढण्यांत आले परंतु उपचार करण्या पुर्वीच ते मरण पावले असल्याचे घोषित करण्यांत आले.या अपघाताची नोद महाडशहर पोलिस ठाण्यामध्ये करण्यांत आली असुन अधिक तपास पोलिस निरिक्षक सुधीर अवसरमोल करीत आहेंत.महाड शहरांमध्ये गेल्या अनेक वर्षा पासुन नितीन मेहता एक यशस्वी उद्योजक म्हणुन परिचित होते,त्याच बरोबर रोटरी या समाजिक संस्थेच्या माध्यमांतुन विविध कार्यामध्ये सक्रीय कार्य करीत होते.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार असुन मेहता यांच्या निधनामुळे संपुर्ण महाड शहरावर शोक कळा पसरली आहे.

अवश्य वाचा