पनवेल, दि.13

   कळंबोलीतील डी-मार्टकडून शिवेसेना शाखेकडे जाणार्‍या महिलेला भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर महिला ठार झाल्याची घटना घडली असून या अपघातानंतर मोटसारसायकल चालक पळून गेला असुन कळंबोली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.या अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव पुनम प्रदिप जयस्वाल (34) असे असून त्या कळंबोली सेक्टर-6 ई मध्ये रहाण्यास होत्या. पुनम जयस्वाल या कळंबोलीतील शिवसेना शाखेकडे जाणा़र्‍या लेनवरील नाल्याच्या ब्रिजवरुन रस्ता ओलांडून जात होत्या.

   याचवेळी डीमार्ट कडून शिवेसेना शाखेकडे जाणा़र्‍या भरधाव मोटारसायकल चालकाने पुनम जयस्वाल यांना धडक देऊन त्यांना फरफटत नेले. या अपघातात जखमी झालेल्या पुनम जयस्वाल यांना कुठल्याही प्रकारची मदत न देता, आपली मोटारसायकल त्याच ठिकाणी टाकून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी जखमी पुनम यांना एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. याठिकाणी उपचार सुरु असताना, पुनम जयस्वाल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कळंबोली पोलिसांनी मोटारसायकल चालकावर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

अवश्य वाचा