सध्या महाराष्ट्रात निवडणूकीनंतर स्वस्वार्थासाठी राजकीय पक्षांनी जो पेच निर्माण केला आहे. त्यामुळे मतदार प्रचंड संतापले आहेत. जवळपास १५ वर्षे काँग्रेस- राष्ट्रवादीची राज्यात सत्ता होती. त्यात हिंदुची ससेहोलपट झाली. हे सत्य नाकारता येणारच नाही. त्यामुळे समस्त हिंदूंनी देव,देश अन धर्मासाठी थोडीफार हिंदुबद्दल कणव असलेल्या शिवसेना-बीजेपीला निवडून दिले. निवडुन आल्यावर मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही पक्षांची कुरकुर सूरू झाली.

   शिवसेना हिंदूंची दुर्दशा करणाऱ्या पक्षाशी हातमिळवणी करून केवळ मुख्यमंत्री पदासाठी हिंदुचा घोर अपमान करत आहे. हिंदुत्वप्रेमी शिवसेनेने कट्टर हिंदुत्व जपले होते. तोच पक्ष जर खुर्चीसाठी लाचार होऊन हिंदुद्वेषी पक्षाशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करत असेल, तर ते हिंदु मतदारांना फसवल्यासारखेच आहे. बीजेपी-शिवसेना युती आहे, म्हणून लोकांनी त्यांना मतदान करून जनादेश दिला. मात्र त्याचे तर तीनतेरा वाजले आहेत. विरोधी पक्षांशी हातमिळवणी करणे युतीच्या मतदारांना कधीही पटणार नाही. ज्यांनी हिंदुत्वाकडे पाहत मतदान केले त्यांची फसवणूक झाली, असेच आता चित्र आहे. युतीने सामंजस्याने सत्तेचा तिढा सोडवावा हीच मतदारांची अपेक्षा आहे.

अवश्य वाचा