चिपळूण

   प्रतिवर्षप्रमाणे नॉर्थ इस्ट हरित संमेलनाचे औचित्य साधून रिजनल सेंटर कलकत्ता यांनी ललित कला अकादमी न्यू दिल्ली यांच्या विद्यमाने *नॅशनल पेंटिंग कॅम्प* चे आयोजन केले होते. या पेंटिंग कॅम्पसाठी नॉर्थ इस्ट झोन मधील बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, यासारखी अनेक राज्ये सहभागी होतात या अनेक राज्यांमधून निवडक अकरा जाणकार तज्ञ कलाकारांची निवड केली जाते या वर्षी महाराष्ट्रामधील कोकणातील जेष्ठ चित्रकार -शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांची निवड झाली असून यांना हा बहुमान मिळाला आहे. इतर राज्यांतील कलाकारांबरोबर महाराष्ट्रातर्फ़े सहभागी होण्याचा बहुमान फहक्त प्रा.प्रकाश राजेशिर्के यांना मिळाला या सात दिवसाच्या कॅम्पमध्ये महाराष्ट्र बरोबर इतर राज्यांतील देखील दिग्गज चित्रकार मंडळी सहभागी होती. चित्रकार डॉक्टर गणेश तरतरे, इशिता चौधरी, मोमी कोणवर, श्री मनोहर राठोड, श्री कृष्णा दास, श्री चंद्रशेखर चिठी,पपीता, नंदी,विदेश, भास्कर इत्यादी या कॅम्प मध्ये सहभागी होते. ललित कला अकादमी चे दिल्ली चे चेअरमन श्री डॉक्टर उत्तम पाचारणे तसेच कला अकादमीचे रिजनल सेक्रेटरी बिपिन मात्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.

   कोकणातील ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के हे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे सध्या चेअरमन असून माजी प्राचार्य आहेत. संपूर्ण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार श्री शेखर निकम यांनी त्यांचे अभिनंदन केले असून संस्थेचे सेक्रेटरी सर्व पदाधिकारी,  महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्ग यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अवश्य वाचा