म्हसळा तालुक्यातील मौजे जांभूळ गावामधील शिवरत्न क्रिकेट संघ जांभूळ (मुंबई) यांच्यातर्फे जांभुळजाई चषक 2019 क्रिकेट च्या भव्यदिव्य स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी आयोजित स्पर्धेत सायगाव येथील अमरदिप क्रिकेट संघ सायगाव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर वावडुंगी येथील भोलेनाथ क्रिकेट संघ वावडुंगी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तसेच बोरमाळ येथील श्री धाकसुत बहिरी क्रिकेट संघ यांनी तिसरा क्रमांक प्राप्त केला. संपूर्ण स्पर्धेत मालिकावीर विजेता खेळाडू आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणूनही प्रणित बालाराम तांबडे (सायगाव) याने गौरव प्राप्त केले. उत्कृष्ट गोलंदाज रोहन रविंद्र महाडीक (सायगाव) आणि शिस्तबद्ध संघ म्हणून वडघर क्रिकेट संघास सन्मानित करण्यात आले.

   प्रथम क्रमांक साठी रुपये 18,001/- व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक साठी रुपये 12,001/- व आकर्षकचषक तर तृतीय क्रमांक साठी रुपये 6,001/- व आकर्षक चषक तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, शिस्तबद्ध संघ आणि प्रत्येक सहभागी विजेत्या व उपविजेता संघास मेडल असे बक्षीस स्वरूपात देण्यात आले. सर्व विजेत्या संघांना व क्रिकेटपटूना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

   शिवरत्न क्रिकेट संघाच्या वतीने सर्व देणगीदारांचे आभार मानण्यात आले. आयोजित स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवरत्न क्रिकेट संघ जांभूळ यांचे पदाधिकारी आणि जांभुळजाई ग्रामस्थ व मुंबई मंडळाचे पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली होती.यावेळी मैदानावर म्हसळा, श्रीवर्धन, तळा, या तालुक्यातील गवळी समाज अध्यक्ष, आजी माजी सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाज बांधव व क्रिकेटप्रेमी, क्रिकेटपटू तसेच शिवरत्न क्रिकेट संघ जांभूळ यांचे पदाधिकारी, जांभुळजाई ग्रामस्थ व मुंबई मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा