चिपळूण 

शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा मशाल महोत्सव ऐतिहासिक गोविंदगडावर काल सायंकाळी ञिपुरारी पोर्णिमेनिमित्त संपन्न झाला. किल्ले प्रतापगड नंतर कोकणात होणारा हा पहिलाच मशाल महोत्सव आहे. या निमित्ताने संपूर्ण गडाभोवती मशाली लावण्यात आल्या. गोवळकोट गावातून काढण्यात आलेली शिवछञपतींची पालखी मिरवणूक किल्ल्यात पोहचल्यावर दीपप्रज्वलन, शिवरायांना अभिवादन होऊन गडावर मशाली पेटविण्यात आल्या. साथीला फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. या उत्सवाचे हे सहावे वर्ष होते.

अवश्य वाचा