पाताळगंगा : १२ नोव्हेंबर,

   महाराष्ट्र राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीच्या विनायक मारुती पाटील याने चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदकाची कमाई केली.महाराष्ट्र कामगार मंडळ व  महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवी मुंबई येथे आयोजित  पॉवरलिफ्टिंग   बेंच प्रेस स्पर्धेत ५९ वजनी गटात खोपोलीच्या विनायक पाटील याने प्रथम क्रमांक पटकावून  सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. विनायक पाटील यांच्या यशामुळे  सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

   २४ ते २७ नोव्हेंबर या दरम्यान दिल्ली येथे होत असणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातून त्याची निवड करण्यात आली आहे,  यापूर्वीही विनायक पाटील याने विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून सुवर्ण, रौप्य पदकांची कमाई केली आहे. त्यांनी अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देऊन उत्कृष्ट खेळाडू तयार केले. अनेक स्पर्धात पंच म्हणूनही त्यांना आमंत्रित करण्यात येत असते. विनायक पाटील हे महिंद्रा सानयो कारखान्यात नोकरी करतात.

अवश्य वाचा