पनवेल :

                 गडकोट म्हणजे स्वराज्य आणि स्वराज्य म्हणजे शिवछत्रपती शंभूछत्रपती हे समीकरण समजून शिवसंग्राम प्रतिष्ठान ग्रुप ग्रामपंचात नानोशीमध्ये गडदुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन केल होत या गडदुर्ग बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांना आपल्या मातीची ओढ लागावी  आणि या मातृभूमीसाठी आपलं जीवन अर्पण करणाऱ्या शिवरायांचा इतिहास या लहान मुलांना कळवा हाच यामागचा उदात्त हेतू असतो कारण उगवती पिढी हेच देशाचं भविष्य आहे.शिवरायांच्या विचारांची पिढी घडवायही असेल तर प्रत्येक गावागावात असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे 

                गडदुर्ग बांधणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मार्गदर्शन करायला आलेले  मावळ(पुणे) युवाशिवव्याख्याते धारकरी आशुतोष झा आणि  ह.भ.प. भागवताचार्य महेश महाराज साळुंखे,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य प्रकाश पाटील,नानोशी ग्रामपंचात सरपंच रमेश पाटील उपसरपंच वैभव पाटील ओवले गावचे सरपंच सुनील पाटील आणि वकील जितेंद्र म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली . युवाशिवव्याख्याते आशुतोष झा यांनी जमलेल्या तरुणांना आणि माताभगिनींना शिवछत्रपती,धर्मवीर शंभूछत्रपती, पृथ्वीराज चौहान,हिंदुत्व,लव्ह जिहाद याबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केले.

         या स्पर्धेत ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यामधील कु.कार्तिक घरत या बाळ कलाकाराने साकारलेल्या दुर्गदुर्गेश्वर श्रीरायगडच्या सुंदर प्रतिकृतीला प्रथम क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले तर दुर्गराज श्रीराजगडची प्रतिकृति साकारलेल्या कु.राजकुमार कातकरी ला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले  त्याच प्रमाणे श्रीप्रतापगडाची प्रतिकृती साकारलेल्या कु.ईशीता जाधव हिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ आणि सहभागी झालेल्या इतर सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.त्यानंतर शिवरायांची आरती घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अवश्य वाचा