पनवेल दि.11 (वार्ताहर)- पनवेल विधानसभा युवासेनेतर्फे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आ. आदित्यजी ठाकरे ह्यांच्या आदेशाने, युवासेना सचिव, कॉलेजकक्षप्रमुख वरुण सरदेसाई ह्यांच्या सूचनेनुसार व मावळ लोकसभा विस्तारक, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य वैभव थोरात ह्यांच्या निर्देशानुसार आज पनवेल महापालिकेचे सन्माननीय अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, महापौर कविता चौतमोल व पनवेल शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश राजपूत ह्यांची युवासेना पनवेल विधानसभा अधिकारी पराग मोहिते ह्यानी सहकार्यांसोबत भेट घेऊन गेल्या अनेक महिण्यांपासुन पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, कॉलेज तसेच इस्पितळांजवळील क्षेत्रात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि सेवनाचा उच्छाद मांडला आहे. कशाचीही तमा न बाळगता होणारी तंबाखू, गुटखा, सिगरेट, मावा तसेच इतर पदार्थांची सर्रासपणे विक्री सुरू आहे. ह्यात अनेक दुकाने हि अनाधिकृत असून कायदा धाब्यावर बसवून बिंनधास्तपणे हि दुकाने चालवली जातात. ह्या अनाधिकृत दुकानांमधे अनेकदा अंमली पदार्थही विकल्या जाण्याच्या तक्रारी पोलिस दफ्तरी नोंद आहेत. ह्या सर्वात इथला स्थानिक तरुण हा गुरफटला जात असून अनेक तरुण मुल खुल्लेआम नशा करत फिरताना दिसतात. ज्यात काही तर अगदीच कमी वयांचेही आहेत. तरी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

          ह्यासर्व गोष्टी रोखण्यासाठी शासनातर्फे COPTA, 2003 अंतर्गत शिक्षेची तरतूद असून त्यात दोन वर्ष अटक तसेच ५००००/- दंडही नमूद आहे. पण प्रशासनाकडून त्यावर कडक कारवाई होत नसल्याकारणाने ह्या सर्व गोष्टी सर्रासपणे सुरू आहेत. काही विक्रीकेंद्र तर शाळा आणि इस्पितळाना लागूनच उभी करण्या इतपत विक्रेत्यांची मजल गेली आहे.. स्टेशन परिसरात तर टेबल लाऊन कोणत्याही परवानगीशिवाय हे सर्व पदार्थ उघडपणे विकले जात आहेत. ह्यासर्व गोष्टींबाबत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून सदर विषय हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून संबंधित दुकाने व विक्रेत्यांवर COPTA, 2003 अंतर्गत कारवाई करावीत अशी विनंती करण्यात आली. ह्यावेळी  युवासेना पनवेल विधानसभा अधिकारी पराग मोहिते यांच्यासह रायगड जिल्हा समन्वयक नितिन पाटील, ग्रामीण तालुका अधिकारी केवल माळी, उपविधानसभा अधिकारी अरविंद कडव, शहर अधिकारी निखिल भगत,. जितेंद्र सिद्धू, समाधान बंडगर, शहर चिटणीस अभिनय सोमण, विभाग अधिकारी सतिश पाटील, उपविभाग अधिकारी अमोल गोवारी, शाखा अधिकारी जयदीप भगत, मंगेश भगत, प्रज्योत पाटील आदी पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.

अवश्य वाचा