उरण: पराभवाने खचलो नसून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मा.आमदार आणि जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी केले. विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाबद्दल चिंतन व आभार व्यक्त करण्यासाठी रविवार ता.10 रोजी बोलविलेल्या बैठकीत ते बोलत होते. विधानसभा निवडणूकीत शिवसेना हरली असली तरी रायगडमध्ये  यापुढील सर्व निवडणूकीत भाजपाला गाडण्याचे काम शिवसेना करणार आहे. मित्र म्हणणार्‍यांनी पाठीत खंजीर खूपसला त्यांना बाजूला सारून येथे संघटना मजबूत करून येणार्‍या नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विजय मिळवण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणूकीत ज्या शिवसैनिकांनी कठोर मेहनत घेवून शिवसेनेच्या व माझ्या विजयासाठी प्रयत्न केले त्यांना धन्यवाद देत

 यापुढे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मजबूत करणार असल्याचे मा. आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सांगितले.

या बैठकीला मार्गदर्शन करताना अनेक पदाधिकाऱयांनी आपल्या मनातील भावना स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर यांनी पराभवाला आपल्यातीलच हेवेदावे व पाडापाडीचे राजकारणच जबाबदार असल्याचे सांगत आपणच त्यांना मोठे केले असल्याचे सांगितले. हे सर्व बाजूला ठेऊन आता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच काहींनी जे पदाधिकारी निष्क्रिय आहेत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या बाबत पक्ष संघटना व वरिष्ठ पदाधिकारी काय निर्णय घेतात याकडे उरणच्या शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीला माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश म्हात्रे,शिक्षक सेनेचे नरेश मोकशी सर तालुका संपर्क प्रमुख जे.पी. म्हात्रे, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, उपतालुकाप्रमुख प्रदिप ठाकूर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे,शहर प्रमुख विनोद म्हात्रे,नगरसेवक अतुल ठाकूर, उपजिल्हा संघटिका ममता पाटील, उरण तालुका संघटीका भावना म्हात्रे शहरसंघटक सुजाता गायकवाड, संघटक मेघा मेस्त्री, संघटक वीणा तलरेजा, संघटक वंदना पवार, सुनिता कडू, उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख,शाखा प्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते  आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

अवश्य वाचा