मुंबई, दि. ११ - भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्यात
अपयशी ठरल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी रात्री तिसऱ्या क्रमांकाचे
संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. मंगळवारी रात्री साडेआठ
वाजेपर्यंत त्यांना आपला निर्णय कळवण्यासाठी मुदत दिली आहे.
राज्यपालांच्या निमंत्रणानंतर रात्री साडेआठ वाजता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित
पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ राज्यपालांना जाऊन भेटले. भेटीनंतर
प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी आम्ही आमचा मित्रपक्ष काँगेसबरोबर चर्चा करेल
आणि लवकरात लवकर राज्यपालांना आमचा निर्णय कळवेल, असे सांगितले.

अवश्य वाचा