मुंबई धारावी येथे दिनांक ८ व ९ नोव्हेम्बर २०१९ रोजी संपन्न झालेल्या विभागीय कराटे स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सर्वात दुर्गम आणि डोंगराळ अश्या म्हसळा येथील कुमार आदित्य अभय कलमकर याने कराटे स्पर्धेत  उत्कृष्ट कामगिरी करून  सुवर्ण पदक मिळविले. तसेच सिद्धी  दिपक सावंत हिनेही सुवर्ण पदक पटकाविले.त्याचप्रमाणे  गौरव  गोपीनाथ  पवार , मलिका मनोहर  तांबे आणि अस्मिता  तोडणकर हिस सिल्वर मेडल प्राप्त झाले आहे. त्याच प्रमाणे  सिया तांबे, योगेश  चव्हाण, व तन्वी यांनी सुद्धा चांगल्या  कलेचे प्रदर्शन  केले आहे. लवकरच
बारामती  येथे  होणाऱ्या  राज्यस्तरीय  स्पर्धेसाठी  आदित्य  कळमकर व  सिद्ध  सावंत यांची निवड करण्यात आली असून या सर्वांचे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून कौतुक होत आहे.म्हसळ्या सारख्या ग्रामीण आणि दुर्गम तालुक्यात कोणत्याही प्रकारचे विशेष मार्गदर्शन नसताना आपल्या कराटे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने आदित्य याने आजपर्यंत अनेक पदके कमावली आहेत.आदित्य हा न्यू इंग्लिश स्कूल  म्हसळा या विद्यालयाचा विद्यार्थी असून तो इयत्ता १० वी मध्ये शिकत आहे.

अवश्य वाचा