मोहोपाडा--

  आईवङिलांच्या  स्मरणार्थ  भरत व्रजलाल शहा  यांच्या कडून रायगड जिल्हा परिषद वडविहीर  शाळेस संगणक संच भेट देण्यात आला. आजच्या विज्ञानयुगात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञान युक्त शिक्षण मिळावे म्हणून नेहमीच समाजकार्यात व्यस्त राहणारे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे श्री भरत व्रजलाल शहा यानी जिल्हा परिषदेतील मुलाना संगणक धड़े घेण्यासाठी एक संगणक संच भेट दिला. ही मदत मिळवून देणे कामी वडविहीर  गावातील सामाजिक कार्यकर्ते  दीपक थेरोडे यानी मोलाचे सहकार्य केले .तर कार्यक्रम प्रसंगी  विश्वमोहन शशीशेखर करजोडकर ,तर  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुनंदा भोसले ,सदस्य सुतार साहेब, भिवा जाधव व शाळेचे मुख्याध्यापक  राजेन्द्र फुलावरे , सचिन चोपड़े सर व विद्यार्थी उपस्थित होते.

अवश्य वाचा