पाली/वाघोशी:

        मुंबई - गोवा महामार्ग व मुंबई - पुणे महामार्ग यांना जोडणारा महामार्ग म्हणजे खोपोली - पाली - वाकण (548अ) हा महामार्ग आहे. पुणे, लोणावळा, खोपोली या मार्गाने आलेल्या प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी खोपोली- पाली- वाकण या महामार्गाचा उपयोग मोठया प्रमाणावर होतो. यामुळे या महामार्गामुळे अनेक लोकांना पुणे, गोवाकडे जाण्यासाठी लागणा-या वेळेत बचत होते. तसेच खालापूर तालुक्यातील खोपोली गावाजवळ असणारे अष्टविनायक गणपतीचे ठिकाण महड व सुधागड तालुक्यातील अष्टविनायक गणपतीचे ठिकाण पाली हे या मार्गावर येतात. या प्रसिध्द ठिकाणामुळे खोपोली-पाली-वाकण महामार्गावर नेहमी भक्तभाविकांची रेंलचेल असते. त्यामुळे या महामार्गवर नेहमीच प्रवाशी, वाहतूकीची वर्दळ असते. दररोज हजारो प्रवाशी या मार्गावरून येजा करतात. तसेच जिंदाल , आय.पी.सी.एल, महाविदयालय, काॅलेज-षाळेच्या बसेसही या मार्गाने दररोज जात येत असतात.

        वाकण ते पाली यामधील अंतर फक्त 8 किलोमीटर लांबीचे आहे. वाकण - पाली रस्त्यावरील वजरोली गावापासून ते वाकण फाटापर्यंतचा रस्ता नागमोडी वळणावळणाचा आहे. विशुध्द रसायन कंपनीच्यापुढे गेल्यास वळणावळणाच्या रस्त्याला सुरूवात होते. नागमोडी वळणामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या एका बाजूला मोठा डोंगर लागूनच आहे. तर दुस-या बाजूला आंबा नदीचे खोल पात्र आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगरावरून कधीही दगड किंवा दरड कोसळण्याची षक्यता नाकारता येत नाही. तर दुस-या बाजूला असलेल्या आंबा नदीच्या पात्राची खोली ही अंदाजे 20 ते 25 फुट खोल आहे. सुधागड तालुक्यातून वाहत जाणारी अंबा नदी ही वाकण - पाली रस्त्यांला लागूनच वाहताना काही ठिकाण दिसते. वाकण - पाली रस्त्यांच्या बाजूने अंबा नदी वाहत असल्याने सुरक्षारक्षक भिंत अथवा कठडा, सुरक्षारक्षक पत्राची भिंत यांची गरज आहे. वजरोली गावापासून ते जंगली पीर मषिदीजवळ असणा-या नागमोडी वळणावर काही ठिकाणी सुरक्षारक्षक पत्राची भिंत आहे. तर काही ठिकाणी ती कोसळलेल्या अवस्थेत आहे. संरक्षण खांब तुटलेल्या, गंजलेल्या अवस्थेत आहेत. याच काही ठिकाणी पत्राची खांबाऐवजी बाबू, काठाचा वापर केला आहे. त्यातील काही जुन्या लोखंडाच्या संरक्षण खांबाची पाऊस, ऊन, वारा या सर्वाचा परिणाम होऊन ते गंजलेल्या अवस्थेत असल्याचे आपल्याला मिळते. या खांबाचा बराचसा भाग तुटलेल्या अवस्थेत आहे. यामुळे खोपोली -वाकण- पाली मार्गावर रात्री अपरात्री मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रात्री अपरात्री वाहन चालकांना हया रस्त्यांनी प्रवास करताना संरक्षण खांब नसल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

 

 

अवश्य वाचा