श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सभा दिनांक १० नोव्हेम्बर २०१९ रोजी म्हसळा येथील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली.रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे,तळा तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे,श्रीवर्धन विधानसभा संयोजिका हेमा मानकर,प्रकाश रायकर,तुकाराम पाटिल, आत्माराम शेलार,रमेश लोखंडे,शैलेश रावकार,शहनावाज खांचे,भालचंद्र करडे आदि मान्यवर उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत आम्ही या मतदार संघात लढलो मात्र पुन्हा एकदा या मतदार संघात शिवसेना नेतृत्वाला नाकारले आहे असे निकाला वरून दिसून येत असल्याचे कृष्णा कोबनाक यांनी सांगून जनतेला विकास पाहीजे व शिवसेना विकासा बाबतीत कमी पडली आहे,मात्र भाजपाने  मागील पाच वर्षात शासकीय विविध योजनेच्या माध्यमातून गावा, गावात विकास केला त्यामुळे भाजपा बद्दल जनतेमध्ये अनुकुलता निर्माण झाली होती मात्र शिवसेना नेतृत्वाने हा मतदार संघ आमचा बालेकिल्ला आहे असे सांगून युती मध्ये त्यांच्या कडे मागितले होते मात्र शिवसेने कडून अचानक बाहेरून दिलेला उमेदवार जनतेने स्विकारला नाही व पुन्हा येथे राष्ट्रवादी ने बाजी मारली आहे. आम्हा ला पराभव देखील जिव्हारी लागला असून आम्ही पराभव मान्य केला असल्याचे कोबनाक यांनी सांगितले. आम्ही आमच्या पक्षामार्फत फार मोठ्या प्रमाणात विकास कामें सुरू केली आहेत. जनतेला आमच्या बद्दल नाही तर शिवसेना पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी आहे. यापुढे आम्ही या मतदार संघात भाजपा नेतृत्व मजबूत करून ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत मध्ये नियोजित पध्दतीने काम करून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व पदाधिकारी याना सूचना केल्या असून पुढील पाच वर्षे या मतदार संघात भाजपा एक क्रमांक ला घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. लवकरच आमच्या पक्षाचे संघटनात्मक बदल होणार आहेत, नवीन जिल्हा व मंडळ पदाधिकारी नेमणूका होणार आहेत यामध्ये चांगले काम करणाऱ्या पदाधिकारी यांना सर्वानुमते जबाबदारी मिळावी या करिता या बैठकीत सूचना करण्यात आल्या आहेत. या मतदार संघातील पाच तालुक्यातील शहरात अनेक प्रकारप्रकारच्या गैरसोयी व गैर प्रकार सुरू आहेत या करिता शहरातील पदाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करावे असे आवाहन केले आहे. अनेक विषयावर चर्चा करून बैठक समारोप करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन जिल्हा चिटणीस महेश पाटील  यांनी केले.

अवश्य वाचा