मुंबई
नगरसेवक,सभापती, आमदार, खासदार नसून महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष तसेच सावंतवाडी संपर्क अध्यक्ष पदांवर कार्यरत असून मालाड पूर्व येथिल आप्पा पाड्यातील सर्वच ठिकाणी अॅड.भास्कर परब यांच्या जन्मदिवसानिमित्त चौकात, नाक्यावर, बस स्थानक, विविध ठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहे.त्यामुळे सर्वच ठिकाणी शुभेच्छा चा वर्षाव होत असताना दिसत आहे.मालाड आप्पा पाड्यातील एक अष्टपैलु व्यक्तिमत्व, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आधुनिक तंत्रज्ञान, जनसामान्यांच्या समस्या आदींचा परिपूर्ण सखोल अभ्यास असलेले अॅड. भास्कर परब अशी ओळख आहे. एल.एल.बी.च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन वकीली क्षेत्रात पदार्पण करुन समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
समाजसेवेची आवड असलेल्या या तरुणाने सामाजिक व राजकीय क्षेत्रांत देखील आपला प्रभाव तेवढ्याच हिंमतीने निर्माण केला,येथील तरुणांचे आवडते नेतृत्व म्हणून परब यांच्याकडे युवावर्ग आकर्षित होत असताना दिसत आहेत, एक युवक पुढे येतो आणि बघता बघता अख्या युवापीढीला आकर्षित करतो, खर तर या युवापीढीला आपल्याकडे वळवणे हे आधीच्या काळापेक्षा सोप राहिलेलं नाही,परंतू त्यांच्या कामांमुळे असंख्य तरुणाचे आदर्श आणि प्रेरणास्थान बनले आहे, परब यांच्याकडे कोणत्याही सरकारी पद नसताना त्यांनी लोकांसाठी रुग्णवाहिका, ज्येष्ठ नागरिक कट्टा व वृत्तपत्र वाचनालय,वातानुकुलित ग्रंथालय आणि अभ्यासिका, तसेच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने अॅड.भास्कर परब यांच्या संकल्पनेतून आप्पापाडा प्रवेशद्वार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक साकारण्यात आले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा राजसाहेब यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला होता.
राजकीय क्षेत्रात वावरत असताना मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या विकासातही तेवढ्याच प्रमाणात भर देत आहेत,राजसाहेब यांच्यावर नितांत प्रेम करणारा कट्टर समर्थक आणि कार्यकर्ता असून पक्षांची बांधणी करताना त्यांच्याकडे विविध पक्षांचे मित्र मंडळी यांच्यासोबत हितसंबंध जोपासताना सर्वांशी एक आपुलकीचे, जिव्हाळयाचे नाते घट्ट केले, सामाजिक व राजकीय व्यासपीठावर दिसत असले तरी आपला हेतू ठामपणे स्पष्ट करीत राहिला आहे.आज समाजात अॅड.भास्कर परब सारखी ध्येयाने झपाटलेल्या माणसांची नितांत गरज आहे.समाजात अलिकडे संकुचित वृत्तीत मोठया प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशा कठीण काळात 'माणुसकीचं झाड' मनापासून जोपासणा-या ध्येयवेडया वेडया माणसांची गरज आहे.आतापर्यंत समाजहितासाठी अविरतपणे झटत आहात यापुढच्या काळातही असेच उत्साहाने काम करीत रहा हीच जन्मदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
Copyright © 2019 कृषीवल. Maintained By Initialize Group