पनवेल, दि.11

   दोन अनोळखी महिलांनी रेडीमेंड कपड्याच्या दुकानात जावून तेथून हजारो रुपये किंमतीच्या कुर्त्यांची चोरी केल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे.

   नंदनलाल केशवदास मोटवानी यांच्या सिद्धेश्‍वर हाईटस् सेक्टर 21 येथे बालाजी इंटरनॅशनल रेडीमेंट कपड्याचे दुकान या दुकानात 35 ते 40 वर्षीय दोन अनोळखी महिला आत शिरल्या व त्यांनी मोटवानी यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या दुकानातील जवळपास 28 हजार 300 रुपयांच्या लेडीत कुर्त्यांची भरलेली काळ्या रंगाची रेडीमेंड बॅग घेवून त्या पसार झाल्या. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अवश्य वाचा