पनवेल, दि.11 

   आसुडगाव परिसरात उभ्या करून ठेवलेल्या ट्रेलरची चोरी केल्याप्रकरणी तळोजा पोलिसांनी एका चोेरट्यास अटक केली आहे.गोपीनाथ तुळशीराम मुंढे यांचा ट्रेलर क्र.एमएच-46-एफ-4920 हा त्यांनी हनुमान मंदिर आसुडगावच्या बाजूला सेक्टर 7 येथे उभा करून ठेवला असता सदर ट्रेलरला जीपीआरएस सिस्टीम बसविण्यात आली होती.

   सदर ट्रेलर अज्ञात चोरट्यांनी चोरुन तो तळोजा औद्योगिक वसाहतीच्या हद्दीतून घेवून जात असल्याची माहिती त्यांच्या मोबाईल त्यांना दिसली. त्यानुसार त्यांनी खांदेश्‍वर पोलीस ठाण्याला तक्रार देवून सदर ट्रेलरचा पाठलाग केला असता तो ट्रेलर तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शालीमार हॉटेल समोरील रस्त्यावर पकडण्यात आला. याप्रकरणी चंद्रकांत कलप्पा निलंगे (34) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अवश्य वाचा