पेण

 समाजाभिमुख कार्य करणारी संस्था म्हणून ओळख निर्माण करणारी सहयोग मानव जनजागृती संस्था तरुणांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण करत असल्याचा प्रत्यय समाज श्री या शरीर सौष्ठव स्पर्धे दरम्यान आला, तरुणांना व व्यायामपटूंना व्यासपीठ निर्माण करून व्यायामाची आवड निर्माण करण्याच्या प्रमुख हेतूने स्व. प्रवीण काशिनाथ पाटील स्मृती मंचाच्या व्यासपीठावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गडब " समाज श्री" चा मानकरी  खारघरचा मयूर घरत ठरला. तर एकूण १०९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे उपाध्यक्ष प्रशांत पाटील ,घनश्याम पाटील,तन्मय पाटील,प्रकाश पाटील,कैलास पाटील ,जयेश केणी,कल्पेश पाटील,हेमंत केणी, तेजस पाटील,निलेश पाटील,हर्षल केणी व सुखकर्ता ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली . 

 यावेळी वडखळ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, विशाल शिंदे, पाली मुख्याध्यापक के. पी. पाटील , प्रशांत पाटील डोंबिवली, हिराजी चोगले, तुळशीदास कोठेकर, पेण फोटोग्राफर अध्यक्ष समाधान पाटील, पोलीस हवालदार एकनाथ सकपाळ,दिनेश भोईर,अमोल म्हात्रे ,जिते  हॅट्रिक सरपंच वासुदेव म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते रावे आदिनाथ पाटील  आदींसह गडब ग्रामस्थ व क्रीडा रसिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक  करताना समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी गडब परिसरातील तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी संस्था कार्यरत असून कला,क्रीडा,शैक्षणिक व बेरोजगारी अश्या विषयांना न्याय देण्याचे काम करायचे असल्याचा निर्वाळा दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे,के. पी. पाटील आदींचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशांत पाटील यांनी केले. 

 समाज श्री स्पर्धा ५ वजनी गटांमध्ये खेळवण्यात आली  होती ५५ किलो मध्ये प्रथम नरेश पवार कामोठे ,६० किलो मध्ये स्वप्नील सोनावणे, ६५ किलो मध्ये ऋषिकेश पेणकर, ७० किलो मध्ये हरेश साळुंखे - साळुंखे जिम पेण ,खुल्या गटामध्ये मयूर घरत यांच्या मध्ये अंतिम फेरी घ्या आली  व यामधून  मयूर घरत खारघर याने समाज श्री २०१९ चा 'किताब पटकाविला. स्पर्धेचे नियोजन आशिया बॉडी बिल्डर्स असो. सेक्रेटरी डॉ. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोशिएशन चे सेक्रेटरी दिनेश शेळके ,राजेश अनगत,सुनील नांदे,जगदीश आगिवले,शशिकांत मुंडे आदींनी पंच कामगिरी पार पाडली. 

अवश्य वाचा