मुंबई, 

 भारतातील ४०कोटींहून अधिक लोकांना २०२२ सालापर्यंत प्रशिक्षित करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 'स्किल इंडिया मिशन' च्या अनुषंगाने, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने अपग्रॅडला मान्यता दिली असून, त्यास सरकारच्या स्किल इंडियाचा भाग म्हणून दर्जा दिला आहे.

या सहयोगाद्वारे, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवून व्यावसायिक प्रशिक्षण व प्रमाणपत्र सुविधा देण्याचे उद्दिष्ट आहे. या भागीदारीद्वारे, अपग्रॅडने येत्या तीन वर्षांच्या कालावधीत ३२००० विद्यार्थ्यांना आयटी/आयटीईएस, बीएफएसआय व मॅनेजमेंट अशा क्षेत्रांत प्रशिक्षण व प्लेसमेंट देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

मयंक कुमार, सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, अपग्रॅड म्हणाले, “कौशल्य विकासाला चालना देणे आणि खासगी क्षेत्राकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना उत्तेजन देणे, हे उद्दिष्ट असणाऱ्या एनएसडीसीकडून मान्यता मिळाल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या सहयोगाद्वारे, आम्ही लोकांच्या कौशल्यामध्ये वाढ करणार आहोत आणि त्यांना उज्ज्वल भवितव्य साकारण्यासाठी सज्ज करणार आहोत. शिक्षणासाठी समर्पित व पॅशनेट ब्रँड म्हणून, समाजामध्ये बदल घडवून आणू शकेल, अशी यंत्रणा उभारण्यासाठी आणि त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.आम्ही अवलंबलेल्या सर्वोत्तम पद्धती आणि आम्ही करत असलेले प्रयत्न यांची दखल या मान्यतेमुळे घेण्यात आली आहे. या सहयोगाद्वारे आम्ही देशातील गुणवान मनुष्यबळाला आकार देण्यासाठी मोठी भूमिका बजावू शकू, असा विश्वास आहे ”. 

अपग्रॅडचे ऑनलाइन कोर्सेस प्रमाणित आहेत आणि आपापल्या क्षेत्रांत रोजगाराच्या उत्तम संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व प्रोफेशनलकडून नावाजलेले आहेत.

अपग्रॅडविषयी : - अपग्रॅडची स्थापना २०१५ मध्ये रॉनी स्क्रूवाला, मयंक कुमार, फाल्गुन कोमपल्ली व रवीजोत चुघ यांनी, औपचारिक शिक्षण ऑनलाइन देण्याच्या उद्देशाने केली. ४ वर्षांच्या अल्प कालावधीमध्ये, अपग्रॅडने १५ हजारांहून अधिक पेड लर्नरचा समावेश केला आणि जगभरातील ३६३ हजारांहून अधिक व्यक्तींना सेवा दिली. यामुळे भारतातून मिळालेल्या एकूण उत्पन्नाच्या बाबतीत ही भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन उच्च शिक्षण देणारी कंपनी ठरली आहे.

कंपनीला २०१९ मध्ये आयएएमएआयने ‘बेस्ट टेक फॉर एज्युकेशन’पुरस्काराने गौरविले. कंपनीला इकॉनॉमिक टाइम्स कडून ‘बेस्ट एज्युकेशन ब्रँड्स’ पुरस्कार मिळाला, तर कंपनीने २०१८ व २०१९ अशी सलग दोन वर्षे लिंक्डइनच्या ‘टॉप २५ स्टार्टअप्स’ मध्ये स्थान मिळवले.

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत