१३४ वर्षाचा वादाला पूर्णविराम देत सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेवर श्री रामाचे मंदिर उभारण्यास परवानगी दिल्याने जगभरातील हिंदूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समस्त जगाचे डोळे विस्फारले जातील असे भव्य दिव्य राम मंदिर लवकरात लवकर या ठिकाणी निर्माण व्हावे अशीच इच्छा आता सर्वांची असणार आहे. अर्थात यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार हेही निश्चित आहे. सधन हिंदू यासाठी सढळ हस्ते अर्पण करतील यात शंका नाही; मात्र आजमितीला देशभरातील शेकडो मंदिरात भक्तांनी स्वेच्छेने दिलेला निधी जमा आहे. ही श्रीमंत देवस्थाने सरकारने अधिग्रहीत करून त्यांचा कारभार सरकारी नियंत्रणात ठेवला असला तरी याच मंदिरांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. शिवाय भक्तांनी श्रद्धेने देवाचरणी वाहिलेला निधी सरकार विविध योजनांसाठी आणि विकासकामांसाठी हवा तसा वापरते. वास्तविकतः  देवाचरणी  वाहिलेला निधी हा धार्मिक कार्यासाठीच वापरला जायला हवा. अधिग्रहीत मंदिरात जमा झालेले देवधन अयोग्य ठिकाणी जाण्याऐवजी ते अयोध्येत श्री राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी वापरले गेल्यास निधी अर्पण करणाऱ्या भक्तांनाही आनंदचं होणार आहे !

 

अवश्य वाचा