कर्जत-दि.10

    मागील वर्षभरापासून कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात चोऱ्या, घरफोड्या होत असून काल शनिवारी पुन्हा एकदा कर्जत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आशापुरा मोबाईल आणि घड्याळ विक्रीचे दुकान चोरटयांनी फोडून  मोबाईल, मनगटी घड्याळे आणि रोख रक्कम असे एकूण एक लाख तीस हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला .

    चंद्रकांत मांडे यांनी आपला दुकान गाळा वीरराम पुरोहित यांना भाड्याने दिला आहे त्यांनी त्या गाळ्यात मध्ये आशापुरा या नावाने मोबाईल विक्री चे दुकान सुरू केले आहे. शनिवारी नेहमी प्रमाणे सकाळी दुकान उघडण्यास आले असता त्यांना दुकान चोरटयांनी फोडल्याचे लक्षात आले. दुकानामधील सहा मोबाईल, सोनाटा कंपनीची तेरा घड्याळे, लॅपटॉप, रोख रक्कम गायब होती.

    सदर चोरट्यांचे चित्रण सीसी टीव्ही कॅमेरे मध्ये झाले आहे. त्या मध्ये 22 ते  23 वर्षाचे युवक दिसत आहेत. या बाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पीएसआय सचिन गावडे अधिक तपास करीत आहेत. या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांत, व्यापारी वर्गात असुरक्षित्तेचे वातावरण निर्माण झाले आहे

अवश्य वाचा