उरण

    महाराष्ट्र राज्यातील महत्वाचा कष्टकरी आणि मेहनती असणारा समाज म्हणजे लोहार समाज असून,अशा होतकरू लोहार समाजाचे आऱक्षण भटक्या जमाती  मागास वर्गामध्ये समावेश करण्यात आल असून शासनामार्फत अनेक योजना या समाजाला उपलब्ध आहेत.
 
    वेश्वी गावात त्या योजनांपासुन हा समाज वंचित होता
उरण तालुका लोहार समाजाचे अध्यक्ष् राहुल रमेश कोशे,उपाध्यक्ष् कृष्णा वालकू व्यापारी ,सहसंघटक संतोष बाबू जाधव तसेच चंद्रकांत जोशी यांनी उरण तालूक्यातील वेश्वी या ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला.त्याला दाद देत वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच अजित पाटील व ग्रामसेविका  सौ.सरोज पाटील व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी वर्ग यांनी
मागणी पुर्ण केली.

    वेस्वी ग्रामपंचायती मार्फत 15 टक्के निधीतून त्यांना भांडी मंजुर करण्यात आली व भांड्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. या प्रसंगी वेश्वी ग्रामांपंचायतीचे सरपंच अजित पाटील,सौ. ग्रामसेविका सरोज पाटील तसेच उपसरपंच संदेश कोळी व सदस्य व सदस्या व हिंद्भ लोहार समाज उरण मधील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत  लोहार समाजाला भांडी वाटप करण्यात आली.या भांडी वाटपामुळे
 लोहार समाजाने वेथ्वी ग्रामपंचायतीचे मनापासून आभार मानले.

    या प्रसंगी भांडी वाटप कार्यक्रमाला हिंदु लोहार समाज महारास्टू मुंबईचे अध्यक्ष् आण्णा साहेब जोशी,मनोहर मनेर सुरेश कोश सौ लातीका खंडागले,काशीनाथ जोशी,जगन्नाथ जोशी,अनंता जोशी,नारायण जोशी,तथा उरण तालुका लोहार समाज कमिटीचे सर्व सदस्य माहिला सदस्या तसेच वेश्वी गावातील सर्व लोहार समाजातील नागरिक मोठया संख्येने उयस्थित होते.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'