आगरदांडा  

     महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जमातीसाठी स्वछ पाणी मिळण्यासाठी व पाळीव प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पशु वैद्यकीय खात्यामार्फत वॉटर फिल्टर व अन्य वस्तूंचे वाटप करण्यात येते.यावेळी सुद्धा सदरचा कार्यक्रम उसरोली व खारआंबोली ग्रामपंचायत मधून ३४ लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.सदरचा कार्यक्रम
औषध शास्त्र  विभाग,  मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय व आय सी ए आर यांच्या संयुक्त विद्यमाने  मोनिटरींग आफ ड्रग रेसिडयुज योजने अंतर्गत योजना प्रमुख व विभागीय मुख्य डॉ  एस एस सोले,  सरपंच   मनिष नांदगावकर व  चरण पाटील यांच्या संयोगाने वॉटर फिल्टर  वाटपाचा कार्यकम उसरोली व खारंबोली ग्राम पंचायतीत बुद्ध विहार या ठिकाणी पार पाडण्यात आला या कार्यकमाचा मुख्य उद्देश मागासवर्गीय समाजातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे स्वास्थ सुदृढ रहावे व पशुंचे शास्त्रीय संगोपन कसे करावे हा होता.

     उसरोली ग्रामपंचायतचे सरपंच मनीष नांदगावकर यावेळी म्हणाले कि,शासकीय अधिकारी वर्गानी समाजातील घटकांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा केला तर निश्चित योजना अमलात येऊन लोकांना शासकीय योजना मिळवू शकतात.ग्रामपंचायतीकडे सुद्धा काही जबाबदारी दिल्यास लोकांना शासकीय योजनेचा फायदा मिळण्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्नशील राहू असे आश्व्सन सरपंच नांदगावकर यांनी यावेळी दिले.

     तालुका पशुवैद्यकीय अधिकारी  डॉ सुदर्शन पाडवे यांनी सदरच्या योजनेचा लाभ लोकांना मिळावा यासाठी पशुवैद्यकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंदानी विशेष मेहनत घेऊन प्रस्ताव तयार केल्यामुळे लाभार्थ्यांना आज विविध वस्तू वाटप करताना आनंद होत आहे.लाभार्थ्यांनी सुद्धा योग्य वेळेत कागदपत्रे दिल्याने आज त्यांना वॉटर फिल्टर सारख्या वस्तू वाटप झाल्याने त्यांच्या घरात शुद्ध पाणी मिळून त्यांचे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होणार आहे.
 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी  डॉ सुदर्शन पाडवे,    डॉ विनायक पवार,   जितेंद्र गावडे,   तेजस सातपुते,  औषध शास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी,  डॉ प्रद्या, डॉ स्नेहलता,  डॉ निवास,  डॉ परशुराम व  संदीप घाडी यांनी अथक परिश्रम घेतले.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'